सूक्ष्म सिंचन योजनेचा राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:41 PM2019-04-06T23:41:03+5:302019-04-06T23:41:51+5:30

आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेती योग्य क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन योजनेचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा प्रयोग राज्यातील सुक्ष्म सिंचनाचा पहिला असून २५० कोटीच्या या योजनेतून ५६ गावातील ८ हजार ५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

First use of micro irrigation scheme in the state | सूक्ष्म सिंचन योजनेचा राज्यातील पहिला प्रयोग

सूक्ष्म सिंचन योजनेचा राज्यातील पहिला प्रयोग

Next
ठळक मुद्दे५६ गावातील साडे आठ हजार हेक्टर शेती येणार सिंचनाखाली

सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्र्वी : आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेती योग्य क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन योजनेचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा प्रयोग राज्यातील सुक्ष्म सिंचनाचा पहिला असून २५० कोटीच्या या योजनेतून ५६ गावातील ८ हजार ५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. विशेष म्हणजे बाराही महिने सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणी मिळणार आहे. आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
आर्वी तालुक्यातील धनोडी येथे निम्न वर्धा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर एकच कालवा असल्याने यात प्रकल्पाचा डावीकडील व मागच्या भागातील शेती व शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांची पाण्यासाठी सुविधा व्हावी यासाठी तालुक्यातील ५६ गावातील शेतकरी निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित होता हे कोरडवाहू क्षेत्र कायम ओलिताखाली आणण्यासाठी सुक्ष्म सिंचनाचा राज्यातील पहिला येथे करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर सध्या युद्धपातळीवर या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाण्याची भविष्याची गरज लक्षात घेता कालव्याऐवजी पाईपच्या माध्यमातून या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे. या प्रकल्पाशेजारी पपिंग स्टेशनचे काम केले जात आहे. यावर विद्युत पॉवर स्टेशन तयार केल्या जात आहे. सूक्ष्म सिंचन योजनेला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय ड्रीप व तुषार सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचा हा सुक्ष्म सिंचनाचा हा महाराष्ट्रातला एकमेव प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाच्या धर्तीवर इतरही ठिकाणी असे प्रकल्प हाती घेतले जाणार आहे.

Web Title: First use of micro irrigation scheme in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.