वर्धा जिल्ह्यात कीटकनाशक विषबाधेचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:04 PM2017-11-04T13:04:03+5:302017-11-04T13:06:40+5:30
शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी गुरूवारी करीत असताना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे (३८) या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली. वर्धा जिल्ह्यात विषारी कीटकनाशकचा हा पहिला बळी ठरला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी गुरूवारी करीत असताना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे (३८) या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली. वर्धा जिल्ह्यात विषारी कीटकनाशकचा हा पहिला बळी ठरला आहे. यापूर्वी दोन शेतमजुरांना विषारी कीटकनाशकामुळे बाधा निर्माण झाली होती.
विजय रमेश ठाकरे हे गुरूवारी शेतात तुरीच्या पिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत फवारणी केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले व काही तासातच ते शेतात झोपून राहिले. सायंकाळी ते घरी न परत आल्याने कुटूंबीय व नागरिकांनी शेताकडे धाव घेतली, तेव्हा ते शेतात पडून असल्याचे दिसून आले. त्यांना वडनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी समुद्रपूर तालुक्यात दोन शेतमजुरांना विषारी कीटकनाशकामुळे डोळ्यांना गंभीर इजा झाली होती.