पहिल्या मतदानामुळे तरुणांत उत्साह

By admin | Published: February 5, 2017 12:37 AM2017-02-05T00:37:34+5:302017-02-05T00:37:34+5:30

जि.प. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त

The first voting boosts the youth | पहिल्या मतदानामुळे तरुणांत उत्साह

पहिल्या मतदानामुळे तरुणांत उत्साह

Next

निवडणूक रणसंग्राम : १४ हजार मतदार ठरविणार भाग्य
अविनाश वाघ   पोहणा (पिपरी)
जि.प. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त होत असल्याने विशेषत: तरूणांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवाय रिंगणातील नवीन चेहऱ्यांमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.
पोहणा जि.प. मतदार संघात १८ गावांचा समावेश असून १४ हजार ७५ मतदार आहेत. यापैकी ७ हजार २७३ पुरूष तर ६ हजार ८०२ स्त्री मतदार आहेत. जि.प. गट हा सर्वसाधारण आरक्षित असून पोहणा पं.स. गण इतर मागास वर्गीयसाठी तर पिपरी पं.स. गण अनु. जमाती महिला राखीव आहे.
पोहणा पं.स. गणात एकूण ६ हजार ७५० मतदार असून ३ हजार ४६० पुरूष तर ३ हजार २९० स्त्री मतदार आहे. या गणात पोहणा, बोपापूर, येरला, डोरला, हिवरा, भिवापूर व गंगापूर या सात गावांचा समावेश आहे. पिपरी पं.स. गणात ७ हजार ३२५ मतदार असून ३ हजार ८१३ पुरूष व ३ हजार ५१२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. या गणात पिपरी, वेणी, सेलू, धानोरा, खेकडी, कोल्ही, सावंगी, ढिवरीपिपरी, सास्ती, हडस्ती व धोची ही अकरा गावे आहेत.
पोहणा जि.प. गट जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची मतदार संघाला लागलेली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जाणारा हा गट काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता; पण गत निवडणुकीत या गडाला खिंडार पडले. पहिल्यांदाच भाजपने बाजी मारली. यंदा सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिल्याने येथे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: The first voting boosts the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.