मच्छिमार धडकले एसडीओ कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:57 PM2019-05-08T23:57:12+5:302019-05-08T23:57:32+5:30

अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्री या गावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भोईपुरा येथून भोई समाज बांधवांच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला.

Fishermen stalked the SDO office | मच्छिमार धडकले एसडीओ कार्यालयावर

मच्छिमार धडकले एसडीओ कार्यालयावर

Next
ठळक मुद्देमूकमोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या : दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्री या गावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भोईपुरा येथून भोई समाज बांधवांच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने उपविभागीय महसलू कार्यालय गाठल्यावर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांना सादर केले.
अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सचिन सुरकार व राजरत्न खडसे या पोलीस कर्मचाºयांनी कात्री या गावात बाजाराच्या दिवशी बाजार संपल्यानंतर पैशाचा हिशेब करीत असलेल्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे हिसकावून नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा गावात आला. त्यांनी कुठलाही दोष नसलेल्यांना ताब्यात घेत पोलीस कचेरीत नेले. तेथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अमानुष अत्याचार करण्यात आला. याच घटनेचा निषेध मुकमोर्चाच्या माध्यमातून आज करण्यात आला. दहशत पसरविणाºया अल्लीपूरच्या ठाणेदाराची तातडीने बदली करण्यात यावी. हप्तेखोर पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मासेमारांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. मासेमारांचे मेहनतीचे १२ हजार रुपये त्यांना तातडीने परत करण्यात यावे आदीही या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या मोर्चात किरण पारीसे, योगेश दुधपचारे, प्रकाश पचारे, किशोर सायगन, शंकर पुंड, धर्मपाल शेंडे, अनिल राऊत, चंद्रलाल मेश्राम, रंजना पारीसे, अ‍ॅड. अमोल बावने, मोरे, अ‍ॅड. वलथरे, प्रकाश पचारे, सुदाम कसलुके, मधुकर बावने, अशोक मोरे, पुरुषोत्तम बावने, राजा मन्ने, छाया दानव, बंडु सातघरे, राकेश मोहीजे, पारीसे, आदी सहभागी झाले होते.

Web Title: Fishermen stalked the SDO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा