वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:07 PM2020-10-27T12:07:16+5:302020-10-27T12:07:55+5:30

Wardha News Rain सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.

Five hundred quintals of soybeans soaked in Wardha district; Grain untimely | वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

Next


शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाvचा शेडमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: निसर्गकोपाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर पावसाचा मारा अद्यापही सुरुच आहे. मोठ्या मेहनतीने हाती आलेले थोडेथोडके सोयाबीन वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विकण्यासाठी आणले असता सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.
मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला सोयाबीनची जोमात वाढ झाल्याने यंदा सोयाबीनचे उत्पन्न भरघोस होण्याची अनेकांना आशा होती. पण, सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सध्या एकरी तीन ते पाच पोत्यापर्यंत उतारा असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही भरुन निघणे कठीण आहे. दोन दिवसाच्या सुटीनंतर आणि सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकायला आणले होते. शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल साठवून असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावरच आपला माल टाकावा लागला. अशातच दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन ओले झाले.
यात काही मालाचा लिलाव झाला होता तर काही मालाचा लिलाव बाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या मालाचा लिलाव बाकी होता त्या शेतकऱ्यांना मात्र यार्डात सोयाबीन आल्यानंतरही नुकसानीचा सामना करावा लागला.

आता शेतमाल विक्रीला येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांच्या मालाकरिता तात्काळ शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
सहा एकरात सोयाबीनची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब घाल्याने २६ कट्टे सोयाबीन झाले. ते वाळल्यानंतर केवळ दहा कट्टेच सोयाबीन शिल्लक राहिले. ते विकण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आणले असता आजच्या अवकाळी पावसाने ते पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे आणखीच अडचणीत भर पडली आहे.
- गणपत पोटे, शेतकरी, इसापूर.

बाजार समितीमध्ये आलेल्या आजच्या मालाचा लिलाव झाला होऊन बऱ्याच मालाचा काटाही आटोपला होता. काही माल भरणे सुरु असतानाच पाऊस आल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल सोयाबीन ओले झाले. लिलाव प्रक्रिया आटोपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले. येथील तीन शेड भाजीविक्रेत्यांना दिल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ते शेड खाली करुन द्यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

ओट्यांना शेडची प्रतीक्षाच
बाजार समितीत कित्येक दिवसांपासून ओटे बांधण्यात आले आहे पण, त्यावर अद्यापही शेड उभारले नाहीत. येथील तीन शेड ठोक भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसाने त्यांचा कांदाही भिजला होता. सध्या असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवला असून शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. बाजार समितीत व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर ही बाब नेहमीचीच असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Five hundred quintals of soybeans soaked in Wardha district; Grain untimely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती