दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

By admin | Published: September 24, 2016 02:15 AM2016-09-24T02:15:59+5:302016-09-24T02:15:59+5:30

दरोड्याच्या उद्देशाने शस्त्र व इतर साहित्य घेवून लपून बसून असलेल्या पाच जणांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

Five people arrested for the robbery attempt | दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

दरोड्याच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

Next

सोरटा मार्गावरील घटना : मिर्ची पावडरसह शस्त्र जप्त
वर्धा : दरोड्याच्या उद्देशाने शस्त्र व इतर साहित्य घेवून लपून बसून असलेल्या पाच जणांना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाच जणांकडून लाठी, लोखंडी रॉड, तलवार, दोरी व मिरची पवडरच्या दोन पुड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री पुलगाव ते आर्वी मार्गावरील सोरटा फाट्याजवळील बसथांबा परिसरात करण्यात आली.
योगेश उर्फ काल्या राहुल गणविर (२५) दिनेश केशव कावनकुरे (३७) दोन्ही रा.नागपूर फैल, विजय अरविंद वाघधरे (२६) रा. तारफैल, रितेश बजरंगसिंग ठाकूर (२०) व राजेश उर्फ बाबू गणेश गुप्ता (२१) दोन्ही रा हरिराम नगर, पुलगाव अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर सूमित इंगळे रा. पुलगाव हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, सोरटा फाट्याजवळ असलेल्या बसस्थांब्याजवळ काही युवक अंधारात लुटमार किंवा दरोड्याच्या उद्देशाने लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ठाणेदार मुरलीधर बुराडे, उपनिरीक्षक राजूरकर, हवालदार प्रकाश लसूंते, रवींद्र मूजबैले, विवेकानंद धनुले, संजय रिठे, किशोर लभाने, भारत पिसूड्डे, सागर गिरी, अमोल आत्राम, क्रिष्णा कासदेकर, संतोष दरवरे, पवन निलेकर, विकास मुडे यांनी घटनास्थळ गाठले.
सोरटा फाटा येथे पोहचून बसथांब्याला घेराव घातला असता तिथे हजर असलेले युवक पोलीस वाहन पाहून पळू लागले. पाठलाग करून पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात योगेश गणविर, विजय वाघधरे, दिनेश कावनकुरे, रितेश ठाकूर व राजेश गुप्ता यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक तलवार, दोन लोखंडी रॉड, एक लाकडी दांडा, १५ फुट नायलन दोर, दोन मिर्ची पावडरच्या पुड्या असे साहित्य मिळून आले. यावरून त्यांच्यावर पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Five people arrested for the robbery attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.