दोन तालुक्यांसह पाच गावे झाली जलमित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:04 AM2017-11-10T01:04:49+5:302017-11-10T01:05:52+5:30

जलयुक्त शिवार अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Five villages, including two talukas, were turned into water | दोन तालुक्यांसह पाच गावे झाली जलमित्र

दोन तालुक्यांसह पाच गावे झाली जलमित्र

Next
ठळक मुद्देजलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर जलमित्र प्रथम पुरस्कार सेलू तर द्वितीय पुरस्कार हिंगणघाट तालुक्याला देण्यात आला. याशिवाय गाव स्तरावरील पुरस्कारात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याचे मलकापूर प्रथम, सेलू तालुक्याच्या मदनीला द्वितीय, कारंजा तालुक्यातील मरकसूरला तृतीय तर हिंगणघाट तालुक्यातील उमरी (येंडे) व वर्धा तालुक्यातील तळेगावला अनुक्रमे चौथा व पाचवा पुरस्कार रोख ५० हजार रुपये देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार आशिष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, आयुक्त अनुपकुमार उपस्थित होते. याप्रसंगी विभागातील विविध जिल्ह्यातील गावांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. अधिकारी कर्मचाºयांना मिळणारा प्रथम पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील रविंद्र तुकाराम तुपकर यांना प्रदान करण्यात आला.

या वर्षात झालेली कामे
विभागात सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात २०७७ गावांमध्ये २३ हजार ३७९ विविध जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून १५६ कामे प्रगतीपथावर आहे. लोक सहभाग व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यामधून ७५.२३ लक्ष घट मीटर गाळ काढण्यात आला आहे. सन २०१५-१६ मध्ये सर्व गावे जल परिपूर्ण झालेली असून यातून १ लाख ९ हजार १०८ हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.
आज अखेर १९ हजार ७३२ कामे पूर्ण झाले असून ८४३ कामे प्रगतीपथावर आहे. ९१५ पैकी ७१२ गावे जल परिपूर्ण झाली असून यामुळे ४२ हजार ७१३ हेक्टर सरंक्षित सिंचनाखाली आले आहे. सन २०१७-१८ मध्ये ७५७ गावाची निवड करण्यात आली असून यामध्ये २१ हजार १२० काम प्रस्तावित केली आहे. यापैकी ९५५ कामे सुरू झाली असून शासनाकडून १४६ कोटी ६५ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Five villages, including two talukas, were turned into water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.