उड्डाण पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:04 AM2018-05-17T00:04:12+5:302018-05-17T00:04:12+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावर रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांच्या सततच्या आवागमनामुळे हे फाटक कित्येक तास बंद राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावर रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांच्या सततच्या आवागमनामुळे हे फाटक कित्येक तास बंद राहते. त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होवून जड वाहनासह इतर वाहनाच्याही फाटकाच्या दोन्ही बाजुला रांगा लागतात. या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुल बांधून वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी जवळपास दोन दशकापासून होत आहे. कधी जागेचा वाद तर कधी वार्षिक अंदाज पत्रकात उड्डाण पुलाच्या राशीची तरतुद नसणे या कारणास्तव सतत या उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आहे.
जड वाहनाची वाढती वर्दळ पहाता एखदा सर्व अडचणी दूर करून एकदाचे पुलाचे काम व्हावे अशी मागणी आहे. परंतु तितक्याच तत्परतेने निधी ते अत्याधिक यंत्रसामग्री अभावी हे काम पुन्हा ठप्प आहे. गत काही वर्षात शहराच्या मुख्य मार्गावर जडवाहनाची वाहतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग तर अमरावती-अहेरी हे महामार्ग गेले आहेत. हैदराबादकडून भोपालकडे जाणाऱ्या तसेच शहराच्या उत्तरेकडे जाणाºया मुख्य मार्ग मुंबई- हावडा या रेल्वे मार्गावरून जातो. रेल्वे गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे हे रेल्वे फाटक नेहमी तास-तास बंद राहत असल्यामुळे तेथे उड्डणपुलाची मागणी आहे. परंतु, विविध कारणांमुळे पुलाचे बांधकाम थांबविल्या जात आहे. नागरिकांसह पुलगाव शहराची वाढती लोकसंख्या तसेच शहराचा वाढता व्याप लक्षात घेता संबंधितांनी या उड्डाण पुलाचे बांधकाम युद्धपातळवर पूर्ण करून नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी आहे.