मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:04 AM2019-09-17T01:04:27+5:302019-09-17T01:05:10+5:30

शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो.

A flock of mock animals on the road | मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

Next
ठळक मुद्देवाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात : नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील रेल्वेस्थानक चौकापासून नाचणगाव रोड, कॅम्प रोड तसेच इतर लहान रस्त्यांवर मोकाट जनावरे मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावरील जनावरांच्या ठिय्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. परिणामी, बरेचदा लहान-मोठे वाहनात अपघात होऊन रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.
शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो. या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस सावजाच्या शोधात इतरत्र फिरत असतात. वाहतूक पोलीस व यंत्रणा चिरीमिरी मिळविण्याच्या नादात डोळेझाक करते. त्यामुळे स्टेशन चौकात वाहतूक नियंत्रित होत नसल्याने अनेकदा अपघात होतात. नाचणगाव रोडवरील पं. दीनदयाल चौकात १० ते १२ जनावरांचा कळप ठाण मांडून असतो. हेच चित्र आर. के. हायस्कूलपासून पुढे पहायला मिळते. वास्ताविक मोकाट जनावरांना पकडून संबंधित पशुपालकांवर कारवाई करण्याचे काम पालिका व पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र, हा विभाग बघ्याची भूमिका घेऊन आहे. मोकाट जनावरांकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक असून या प्रकाराकडे लक्ष देवून वाहनचारकांचा जीव वाचवून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. स्टेशन चौकात कर्तव्यावर असणाºया वाहतूक पोलिसांनी इतरत्र न भटकता चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकडेच लक्ष पुरविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या तर लहानमोठ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे बोलले जात आहे.

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त
आर्वी - सध्या शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर विचार करण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्याची स्थिती, रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनाकरिता पार्किंगची योग्य व्यवस्था नसणे आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आर्वी शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाण्यासाठी प्रथम विचार पडतो की, डावीकडून जावे की रस्त्याच्या उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच दुकानासमोर वाहने उभे राहत असल्यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेल्या दुकानामध्ये वाहने उभे केली जात असल्याने, शिवाय फळ-भाजीविक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाड्याकडे जाणाºया रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. रोडवर अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत मोठेमोठे खड्डे पडले आहे. हा अमरावतीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, यावर विश्वास बसणार नाही. अनेक अडथळे पार करीत वाहन अमरावतीकडे निघते. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधत वाहन चालवावे लागते. आर्वी शहरातील प्रत्येक मुख्य चौकात रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या व लोकांची गर्दीच जास्त असते.

Web Title: A flock of mock animals on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.