कामांच्या गुणवत्तेवर भर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:27 PM2018-11-01T22:27:11+5:302018-11-01T22:28:14+5:30
पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. हा निधी योग्यरीत्या खर्च करुन कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा!, असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतून हिंगणघाट तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिला.
‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हिंगणघाट येथील पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती देऊन योजनानिहाय कार्यवाहीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाला चालना देणारी पंचायतराज संस्था असल्याने ग्रामीण व्यक्ती केंद्रस्थानी ठेऊन कामकाज करावे, अशा सूचना जि.प.अध्यक्ष मडावी यांनी दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांनी योजना राबविता पंचायत समिती, बांधकाम, लघूसिंचन, आरोग्य विभागाचे तालुकास्तरीय अधिकाºयांनी कोणत्याही प्रकारची हयगय न करता कामाची दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, समाज कल्याण सभापती निती गजाम, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे, उपसभापती डॉ.विजय पर्बत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करुणा जुईकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव,जि.प.सदस्य माधव चंदनखेडे, शरद सहारे, धनराज तेलंग, जोत्स्ना सरोदे,मिलींद कोपुलवार, विभा ढगे तसेच जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख व पंचायत समितीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी तसेच शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते.