निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

By admin | Published: April 13, 2016 02:20 AM2016-04-13T02:20:05+5:302016-04-13T02:20:05+5:30

केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे.

The following Wardha project was adopted by the Center | निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

Next

रामदास तडस : ६२९ कोटींची तरतूद, २०१७ पर्यंत होणार पूर्ण कामे
आर्वी : केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे. या प्रकल्पातील रखडलेल्या कामासाठी केंद्राच्या बजेटमध्ये ६१९ कोटींची तरतूद केली आहे. २०१७ पर्यंत या प्रकल्पाची रखडलेली संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
राजापूर येथील बाकळी नदीवरील मोठ्या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ६० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ५ टक्केच्या वर खर्च झाला, ते सर्व प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली. खेडी विकसित होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना ८० लाखांचा निधी देण्याची तरतूद आहे. प्रत्येक तालुका स्तरावर शेतमाल तारण ठेवण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज सेंटर’ची निर्मिती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे तर अतिथी म्हणून पं.स. उपसभापती बाळा नांदूरकर, सदस्य वैभव जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष मिलिंद डोळे, माजी खासदार विजय मुडे, राजापूरचे सरपंच प्रा. धर्मेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्य दिनेश डेहनकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्प बाधित २४ गावांसाठी नागरी सुविधा झाल्या आहे. यात प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लागणार असून उर्वरित मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुडे, नांदूरकर यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी राजेश सोळंकी, विजय जयस्वाल यांचाही गौरव करण्यात आला. संचालन करीत आभार गजानन भोरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच राम सावतकर, सदस्य योगेश ठाकरे, नलिनी ढेपे, सरिता उल्हे, शांता, प्रवीण उईके व ग्रामस्थ हजर होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The following Wardha project was adopted by the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.