बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:15 PM2021-12-17T12:15:07+5:302021-12-17T12:15:29+5:30

डॉक्टरांनी दिलं जीवदान, दोन तास शस्त्रक्रिया

A football shaped tumor found in a in students stomach doctors saved her life | बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

googlenewsNext

देऊरवाडा / आर्वी (जि. वर्धा) : बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या दहावीतील विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्युमर) आढळून आला. आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया करीत रुग्णाला जीवदान दिले. 

आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील मुलगी आर्वीच्या मॉडेल शाळेत दहावीत आहे. बऱ्याच दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. अनेक रुग्णालयांत दाखवले; पण आराम पडला नाही. अखेर आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून तिच्या कुटुंबीयांना शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याने सांगितले.

शस्त्रक्रिया सांगताच पालकांचा धीर खचला. परंतु, डॉक्टरांनी महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया केली जाईल, त्यामुळे खर्चाकरिता घाबरण्याचे कारण नाही, असा धीर दिला. पालकांची संमती मिळाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नीरज कदम, तज्ज्ञ डॉ. नरेंद्र गुप्ता, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेअंती पोटातून १० बाय ८ सेंटिमीटरचा गोळा बाहेर काढला. नेमका हा इतका मोठा गोळा कशाचा? असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला असून, तो तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मुलीला असह्य वेदना होत असल्याने उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर १० बाय ८ सेंटिमीटरचा गोळा बाहेर काढण्यात आला. 
डॉ. नीरज कदम, सर्जन व स्त्री रोग तज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी

Web Title: A football shaped tumor found in a in students stomach doctors saved her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर