काठीने मारहाण करणाऱ्यास ठोठावली सक्तमजुरी
By महेश सायखेडे | Published: March 18, 2023 07:27 PM2023-03-18T19:27:53+5:302023-03-18T19:28:07+5:30
क्षुल्लक कारणावरून वाद करून काठीने मारहाण करणाऱ्या एक महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
वर्धा : क्षुल्लक कारणावरून वाद करून काठीने मारहाण करणाऱ्या एक महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रफुल्ल लोखंडे रा. करंजी असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून हा निकाल वर्धा येथील न्यायदंडाधिकारी टी. एम. देशमुख (नाईक) यांनी शनिवार १८ मार्चला दिला.
कुणाल सूर्यभान लांजेवार रा. करंजी (भोगे) यांच्या घराच्या वरील टाकीतून पाणी पडत असताना प्रदीप लोखंडे तेथे आला. पाण्याच्या कारणावरून त्याने कुणाल याच्याशी वाद केला. प्रदीप हा शिवीगाळ करीत असल्याने त्याला शिवीगाळ करू नको असे म्हटले असता प्रदीपची आई व भाऊ प्रफुल्ल हे तेथे आले. दरम्यान प्रफुल्ल याने कुणाल याच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्यास जखमी केले.
या प्रकरणी तक्रारीवरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास दिलीप किटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. आठ साक्षदारांची साक्ष या प्रकरणी न्यायालयात तपासण्यात आली. शासकीय बाजू ॲड. विजय डोरले मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश झाडे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व पुरावे लक्षात घेऊन आरोपीस एक महिन्यांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.