वनविभागाने केला रस्ता बंद

By Admin | Published: April 20, 2015 01:42 AM2015-04-20T01:42:31+5:302015-04-20T01:42:31+5:30

इस्माईलपूर रेतीघाट लिलाव झाल्यावर घाटधारकांनी वनविभागाच्या झुडपी जमिनीतून रस्ता केला़...

The forest department closed the road | वनविभागाने केला रस्ता बंद

वनविभागाने केला रस्ता बंद

googlenewsNext

आष्टी (श़) : इस्माईलपूर रेतीघाट लिलाव झाल्यावर घाटधारकांनी वनविभागाच्या झुडपी जमिनीतून रस्ता केला़ या प्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला होता़ यात तयार केलेला रस्ता वनविभागाने बंद केला; पण अद्याप मुख्य घाटधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही़
शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून वनविभागाने रेती घाट ठेकेदार अनिल मानकर व विवेक ठाकरे यांच्यावर रस्ता खोदकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता़ यातील अनिल मानकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी परिहार यांना जेसीबीला हात लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे धमकावून म्हटल्याचे सांगितले़ मृत्यू पावलेला शेतकरी मानकर यांच्या अरेरावीमुळेच बळी ठरल्याची चर्चा होती़ मानकर कुणालाही धमकी देत असल्याने या प्रकरणात वनविभागाने विशेष लक्ष घातले आहे़ विवेक ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल असला तरी त्यांची केवळ वाहने भाडेतत्वावर आहे़ यामुळे त्यांना आरोपी करणे वनविभागाला डोकेदखी ठरत आहे़ विवेक ठाकरे यांचे बयाण नोंदवून त्यांना चुक नसेल तर वनगुन्ह्यातून सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी परिहार यांनी दिली़ वनविभागाची झुडपी जमन कुठलीही परवानगी न घेता खोदण्यात आली़ यामुळे जंगलाचे नुकसान झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली़ रेतीघाट लिलाव झाल्यावर पाच-सहा जणांनी मिळून रॉयल्टी पासेसवर वाहतूक सुरू केली़ यामुळे या रस्त्यावरून रॉयल्टीसह गेलेल्या वाहनांची चौकशी करण्याचे काम वनविभागाने हाती घेतले आहे़ रस्त्यावर आढळून आलेल्या ट्रकचे फोटो घेण्यात आलेत़ सदर ट्रक अमरावती जिल्ह्यातील असून तर काही ट्रक तालुक्यातील आहेत़ ती वाहने जप्त करण्यात येणार असल्याचेही वन अधिकाऱ्यांनी सांगितले़(प्रतिनिधी)

Web Title: The forest department closed the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.