ब्राह्मणवाडा गावात वन विभागाकडून शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:46+5:302021-05-27T04:42:46+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या ब्राह्मणवाडा या गावातील शेतपिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गावातील ...
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या ब्राह्मणवाडा या गावातील शेतपिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गावातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आणि होणाऱ्या नुकसानीबाबत निवेदन दिले होते. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि होणारे पीक नुकसान कमी करण्यासाठी वन विभागाकडून गावातील सर्व शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन वाटप करण्यात येत आहे. सोलर फेन्सिंगमुळे वन्य प्राण्यांकडून होणारे पीक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
वन विभागातर्फे वितरण करण्यात येत असलेल्या सोलर झटका मशीनचे वाटप केल्यानंतर या मशीनचे वाटप या क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात व्हावे व गरीब शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यात यावे, याकरिता सोयीचे होईल, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती.