शेतकऱ्यांचा शिवारी रस्ता बंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:36 PM2018-07-18T22:36:06+5:302018-07-18T22:36:30+5:30
दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला. त्यानंतर प्रहारचे देवा धोटे यांच्या मदस्तीने समाधानकारक तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
आरंभावासियांच्या शेतामध्ये जाण्यासाठी १८८८ मध्ये नकाशानुसार गावकºयाच्या रस्त्याची नोंद होती. त्याच रस्त्यावर स्मशान भूमी सुद्ध आहे. त्यानंतर १९३० ला सुद्धा नोंद आहे. मात्र, त्यानंतर वनविभागाने सदर जागेवर आपला हक्क दाखवित या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी जेसीबी घेऊन आले. ही वार्ता ग्रामस्थांना माहित होताच ग्रामस्थही तेथे धडकले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर माजी आमदार राजू तिमांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. बाबळे, क्षेत्रसहायक जी.व्ही. बोर, वनरक्षक सुरेखा तिजारे, ठाणेदार प्रवीण मुंडे, देवा धोटे, शंकर हरडे, हरिभाऊ हरडे, किसना सोमलकर, विवेक हिवरकर, पुजा हिवरकर, मारोती वानखेडे, सुषमा हिवरकर, कैलास लढी, नंदा हिवरकर, बाबाराव झाडे, यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
१९९९ मध्ये रिकॉर्ड दुरूस्ती होवून वनविभागाला विस्तार अधिकार प्राप्त झाले. त्यावेळी पूर्ण मोजणी करून आम्ही वनविभागाची हद्द निर्धारित केली. मात्र, त्यावेळी गावकºयांनी आपला रस्ता करून घेण्यासाठी कुणीही समोर न आल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची रस्त्याकरिता जागा सोडली नव्हती. परंतु, गावकºयांची रास्त मागणी असल्यामुळे आम्ही तात्पुरता रस्ता त्यांना उपलब्ध करून देत आहोत.
- बी. डी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी.