तीन हजारांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर ‘एसीबी’च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:16 AM2023-04-13T11:16:02+5:302023-04-13T11:16:44+5:30

दहा हजारांची केली होती मागणी

Forest range officer Gayner in ACB net of while accepting bribe of three thousand | तीन हजारांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर ‘एसीबी’च्या जाळ्यात

तीन हजारांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर ‘एसीबी’च्या जाळ्यात

googlenewsNext

वर्धा : वन गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवीत जेसीबी मालकाकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारंजा (घाडगे) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र कार्यालयातच वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार कारंजा (घाडगे) वनपरिक्षेत्रात एका जेसीबी मशीनने नुकसान केले म्हणून जेसीबी मालकावर वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाईचा निपटारा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. आज कार्यालयातच जेसीबी मशीन मालकाकडून चलनाचे दंड २ हजार रुपये आणि स्वत:च्या आर्थिक लाभासाठी १ हजार रुपये अशी एकूण तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव व पोलिस निरीक्षक संदीप थडवे, रवींद्र बावनेर, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, नीलेश महाजन, प्रीतम इंगळे व प्रशांत मानमोडे यांनी केली.

निवासस्थानीही आढळली ९१ हजारांची रोख

वनविभागामध्ये सध्या लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आले असून, त्यातील हे एक उदाहरण सर्वांपुढे आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांच्या कारंजा येथील शासकीय निवासस्थानाची तपासणी केली असता ९१ हजारांची रोख आढळून आली. त्यांना ताब्यात घेऊन याप्रकरणी कारंजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Forest range officer Gayner in ACB net of while accepting bribe of three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.