अंगणवाडी सेविकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:54 AM2018-03-17T00:54:13+5:302018-03-17T00:54:13+5:30
महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाचक ठरणाºया अटी रद्द करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पटसंख्येच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा. सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकामधील जाचक ठरणाºया सर्व अटी रद्द करण्यात याव्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी. तसेच अंगणवाडीत शासनाकडून येत असलेला टी.एच.आर. बंद करावा व महिला बचत गटातर्फे पुरक पोषण आहार देण्यात यावा. आहार देणाबाबत नव्याने ई-टेंडरिंंग न करता पूर्वी प्रमाणे ते सुरू ठेवण्यात यावे. पुरक पोषण आहाराचा दर ६ रुपये वरुन किमान १५ रुपये करावा. मे २०१७ पासून पुरक पोषण आहाराची देयके प्रलंबित आहेत, ते त्वरीत अदा करावी, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. येत्या काही दिवसात मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व गुंफा कटारे, कल्पना चहांदे, आशा मिसाळ, सुनंदा महाजन, उषा मानकर, संगीता कोहळे, शुभांगी कलोडे, ज्योती हिवराळे, प्रमीला वानखेडे यांनी केले. आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.