हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; सीआरपीएफच्या जवानासह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:45 AM2019-09-26T10:45:26+5:302019-09-26T13:21:41+5:30

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे वाहन गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास अपघातग्रस्त झाले.

Former Union Minister Hansraj Ahir's vehicle accident; Two injured | हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; सीआरपीएफच्या जवानासह दोघांचा मृत्यू

हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; सीआरपीएफच्या जवानासह दोघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसीआरपीएफचे दोन जवान ठार  भरधाव वाहन कंटेनरवर आदळले  चंद्रपूर - नागपूर मार्गावर अपघात  जखमींना नागपुरात हलविले 

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा-

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ)  जवानासह दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे . गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास चंद्रपूरहून नागपूरला जात असताना जामजवळच्या कांडळी नदीजवळ  हा भीषण अपघात झाला.  अहीर यांचे वाहन पुढे निघून गेल्याने ते या अपघातातून बचावले. 
गुरुवारी सकाळी अहिर चंद्रपूरहून नागपूरला यायला निघाले. त्यांच्या मागेपुढे सुरक्षा रक्षकांच्या वाहनांचा काफिला होता. ज्या वाहनात अहीर बसले होते. समोरच्या कंटेनरच्या बाजूने ते  वाहन समोर निघून गेल्यानंतर मागच्या वाहनाच्या समोर अचानक एक प्राणी आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरच्या चालकाने अचानक करकचून ब्रेक मारले. त्यामुळे अहीर यांच्या ताफ्यातील अतिशय वेगात असलेले सीआरपीएफ जवानांचे वाहन कंटनरवर धडकले. या वाहनाचा वेग अधिक असल्याने सुरक्षा रक्षकांचे वाहनाची पुरती मोडतोड झाली. या वाहनात चालक विनोद झाडे,  एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, दीपककुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ जवान) असे सातजण त्या गाडीत होते. त्यापैकी वाहनचालक विनोद विठ्ठलराव झाडे (वय ३७, रा. चंद्रपूर) आणि सीआरपीएफचे जवान फलजीभाई पटेल यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता वाहनातील सर्व जण अक्षरश: त्यात अडकून पडले. मागे असलेल्या आणि पुढे निघून गेलेल्या जवानांनी अपघातग्रस्त वाहनातील जवानांना लगेच बाहेर काढले. समोर निघून जात असलेले अहीर यांनी आपले वाहन माघारी फिरवून अपघातग्रस्तांना तातडीने नागपूरच्या इस्पितळात नेण्याची व्यवस्था केली.   

अपघातस्थळी, रुग्णालयात प्रचंड गर्दी
वर्दळीच्या मार्गावर हा भीषण अपघात घडल्यामुळे अपघातानंतर अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली. जखमींना नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल केल्याचे कळताच येथेही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सीआरपीएफचे अधिकारी तसेच पोलीस अधिका-यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत धाव घेतली. 

Web Title: Former Union Minister Hansraj Ahir's vehicle accident; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.