चार कार, १५ दुचाकींसह चौघांना अटक

By admin | Published: January 24, 2017 08:48 PM2017-01-24T20:48:10+5:302017-01-24T20:48:10+5:30

शहरातील वणा नागरी सहकारी बँकेजवळून चोरी झालेल्या दुचाकीचा शोध घेताना विदर्भातील जिल्ह्यातील वाहन चोरट्यांची टोळीच

Four cars, 15 bikes and four others arrested | चार कार, १५ दुचाकींसह चौघांना अटक

चार कार, १५ दुचाकींसह चौघांना अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
हिंगणघाट (वर्धा), दि. 24 -  शहरातील वणा नागरी सहकारी बँकेजवळून चोरी झालेल्या दुचाकीचा शोध घेताना विदर्भातील जिल्ह्यातील वाहन चोरट्यांची टोळीच पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडून चार कारसह तब्बल १५ दुचाकी किमत
१६ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आल्या. येथील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी अट्टल दुचाकी चोर सुरज उर्फ रग्ग्या रामभाऊ वखरकर रा. हिंगणघाट, बादल सुनील पाटील रा. येसंबा, मेहबूब खान हुसेन खान रा. यवतमाळ, ज्युनैद शानू शेख साबिर (३४) रा. कोहिनूर सोसायटी यवतमाळ या चौघांना अटक केली आहे. प्रमोद रामदास सवाई (४२) रा. हिंगणघाट यांची दुचाकी क्र्र. एमएच ३२ एम ३९६९ ही जैन मंदिर वॉर्ड, वणा नागरी बँकेसमोरून १ नोव्हेंबर २०१६ रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या दुचाकी चोरीचा तपास गुन्हे शोध पथक करीत असताना १६ जानेवारी रोजी अट्टल दुचाकी चोर सुरज उर्फ रग्ग्या रामभाऊ वखरकर रा. हिंगणघाट हा लाल रंगाची चोरीची दुचाकी घेऊन वर्धा मार्गाने धोत्रा गावाकडून वेळा मार्गे हिंगणघाटकडे येत असल्याची माहिती मिळाली. यावरून दोन पंच व पोलीस पथकाने वेळा गावानजिक साखर कारखान्यासमोर रात्री सापळा रचला. यात लाल रंगाची दुचाकी क्र. एमएच ३२ आर १९१६ सह रग्ग्याला रंगेहात पकडले. त्याने ही दुचाकी ५-६ दिवसांपूर्वी बल्लारपूर नगर पालिकेसमोरून चोरून आणल्याची कबुली दिली.
यानंतर त्याची पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसह चंद्रपूर, वरोरा, बुट्टीबोरी, सेलू व हिंगणघाट येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून ९ मोटारसायकल ३ लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. जप्त दुचाकी त्याचा साथीदार बादल सुनील पाटील रा. येसंबा याला विकल्याचे सांगितले.  त्या तीन दुचाकी बादलकडून जप्त करीत त्याला त्याचदिवशी कलम ४११ अन्वये अटक करण्यात आली. आरोपींची अधिक चौकशी केली असता त्याने दीड ते दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर, वरोरा येथून दोन दुचाकी, अमरावती येथून दोन कार चोरीची कुबुली दिली.  त्या कार यवतमाळ येथील शानू याच्या मध्यस्तीने मेहबूब खान हुसेन खान रा. यवतमाळ याला विकल्याचे सांगितले. सदर आरोपींचा शोध घेत मेहबूब खान हुसैन खान रा. यवतमाळ याला २० जानेवारी रोजी अटक केली. नागपूर, सावनेर, कळमेश्वर,
साकोली व यवतमाळ परिसरात तपास करीत त्याच्याकडून दोन दुचाकी व दोन कार, अशी चार वाहने किंमत ६ लाख ७५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली. यानंतर आरोपी ज्युनैद शानू शेख साबिर (३४) रा. कोहिनूर सोसायटी यवतमाळ याला यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगलातून २१ जानेवारी रोजी अटक केली.
त्याच्याकडून एक दुचाकी किंमत ५० हजार रुपये हस्तगत करण्यात आली. चोरीची वाहने घेणारा आरोपी मेहबूब खान याने तपासात दिलेल्या माहितीवरून बडनेरा, अमरावती परिसरातून चोरलेल्या दोनपैकी एक कार अमरावती व एक कार व दुचाकी
अशी वाहने यवतमाळ येथून हस्तगत करण्यात आली. आरोपी मेहबूब खान याने जप्त केलेली कार तथा एका कारचे चेसीस नंबर बदलववून  त्यावर याच मॉडेलच्या अपघातग्रस्त कारची कागदपत्रे चढवून त्या विकल्याचे आढळले. या प्रकरणात
चारही आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात एकूण चार कार व १५ दुचाकी किमत १६ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आल्या. जप्तीतील वाहने बल्लारशाह, चंद्रपूर, वरोरा, बुट्टीबोरी, सेलू, हिंगणघाट व बडनेरा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहन चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे व पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पथकाचे जमादार निरंजन वरभे, अरविंद येनुरकर, ऋषिकेश घंगारे, दीपक जंगले यांनी केली.अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Four cars, 15 bikes and four others arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.