चौघांवर दोन नागरी आरोग्य केंद्रांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:29 AM2018-01-24T00:29:03+5:302018-01-24T00:29:18+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ......

Four civic health centers loaded on four | चौघांवर दोन नागरी आरोग्य केंद्रांचा भार

चौघांवर दोन नागरी आरोग्य केंद्रांचा भार

Next
ठळक मुद्दे१७ पैकी १३ पदे रिक्त : इमारती ठरताहेत शोभेच्या वास्तू, रुग्णांनाही नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आरोग्य केंद्र बहूदा बंद राहते. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राच्या इमारती सध्या रुग्णांसाठी शोभेची वास्तू ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे दोन्ही आरोग्य केंद्रात सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत आहेत.
शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी लोकसंख्येच्या आधारावर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार शहरातील सानेवाडी व पुलफैल भागातील जागेचे नियोजन करून तेथे आरोग्य केंद्रासाठी सुसज्य इमारतही तयार करण्यात आली आहे;पण दोन्ही आरोग्य केंद्रात सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत असल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर बहूदा हे दोन्ही आरोग्य केंद्र बंद राहत असल्याने नागरिकांसह रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे दोन्ही आरोग्य केंद्रात चक्क एकही वैद्यकीय अधिकारी रुजू झालेला नाही. इतकेच नव्हे तर ज्या काही कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती त्यापैकी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजूच झाले नाहीत. दोन्ही आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, चक्क १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदे सध्या रिक्त आहेत. रुग्णांसह नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची शहरातील सुजाण नागरिकांची मागणी आहे.
मद्यपींसाठी सुरक्षित ठिकाण
पुलफैल व सानेवाडी भागातील नागरी आरोग्य केंद्र बहूदा बंद राहत असल्याने व तेथे सुरक्षा रक्षक राहत नसल्याने रात्रीच्या सुमारास तेथे मद्यपींचा डेरा असतो. सानेवाडी भागातील नागरिक आरोग्य केंद्र परिसरात दारूच्या रिकाम्या शिश्या व पाण्याचे पाऊस पडून असल्याचे दिसून येते. मद्यपींचा सर्वाधिक त्रास परिसरातील महिलांना सहन करावा लागत असून दोन्ही आरोग्य केंद्र परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आहे.

शहरी आरोग्य केंद्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी कुणीच वैद्यकीय अधिकारी या केंद्रात आरोग्य सेवा देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आले. आजही कुणी वैद्यकीय अधिकारी येथे सेवा देण्यास तयार असेल तर त्याच्या अर्जावरच त्यांची नियुक्ती करण्यात येईल. शिवाय उर्वरित पदे लवकर कसे भरता येईल यासाठी संबंधीतांकडे पाठपुरावा करू.
- अश्विनी वाघमळे, न.प. मुख्याधिकारी, वर्धा.

Web Title: Four civic health centers loaded on four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.