चार दिवसांपासून सरपंच कांबळे यांचे बेमुदत उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:28+5:30
सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय करण्यात यावी, यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : दिघी (बोपापूर) येथील सरपंच घनश्याम कांबळे यांनी न्यायीक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रविवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कुठलाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आंदोलन मंडपाकडे फिरकला नसल्याने आंदोलन सुरूच होते.
सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय करण्यात यावी, यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांनी या समस्येबाबत वारंवार अवगत केले आहे. एप्रिल महिन्यापूर्वी निवेदन देवून अवगत केले आहे. गावातील शेतकऱ्यांना नदी पात्रातील खोलीकरणामुळे पलीकडे शेती वाहने कठीण झाले आहे. याचा विपरीत परिणाम शेतकºयांसोबतच मजुरांवर झाला आहे. या दरम्यान तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार प्रदीप वर्र्पे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आदी अधिकाºयांनी उपोषण मंडपाला भेट देवून माहिती जाणून घेतली. कांबळे यांचे शरिरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.