शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी वर्धेतील चार नद्यांचे जल रवाना

By admin | Published: December 23, 2016 01:39 AM2016-12-23T01:39:46+5:302016-12-23T01:39:46+5:30

मुंबई येथील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन २४ डिसेंबरला होणार

Four rivers of Warda are going to water for Shivshammar's water supply | शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी वर्धेतील चार नद्यांचे जल रवाना

शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी वर्धेतील चार नद्यांचे जल रवाना

Next

पाणी घेऊन भाजयुमोचे पदाधिकारी मुंबईला
वर्धा : मुंबई येथील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन २४ डिसेंबरला होणार आहे. या सोहळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पाणी गुरुवारी पाठविण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, माजी आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, वर्धेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल तराळे, हिंगणघाटचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, देवळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुचिता मडावी, जि.प. सदस्य राणा रणनवरे, वर्धा न.प. भाजपा गटनेता प्रदीप ठाकरे, डॉ. शिरीष गोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून आणलेले जल एकत्रित करण्यात आले. याप्रसंगी आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकार आपल्या वचनाची पूर्ती करीत आहे. याच अनुषंगाने शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. सरकार सर्व समावेश योजना सर्वसामान्यासाठी राबवित आहे. याप्रसंगी मुंबई येथे जल घेवून निघालेले भाजयुमो तालुकाध्यक्ष सुमित ढवळे, अनुराग कोटमकार, सचिन होले, अभिजीत चौधरी, अ‍ॅड. सुमित गांजरे, पवन गाडेगोने यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला वर्धेचे नगरसेवक निलेश किटे, विजय उईके, सुमित्रा कोपरे, शुभांगी कोलते, बंटी गोसावी, रेणुका आडे, गुंजन मिसाळ, संदीप त्रिवेदी, राखी पांडे, राधा चावरे, आहुजा, भुते, बुरीले, अरविंद कोपरे, सतीश मिसाळ, अभिषेक त्रिवेदी, अर्चना वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज तरारे, अशोक कलोडे, देवळीचे नगरसेवक नरेंद्र मदनकर, सुरेश पट्टेवार, मदन चावरे, शरद आडे, विरू पांडे, श्रीधर देशमुख, श्रेया देशमुख, देवळीच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस, निलेश पोहेकर, अजय वरटकर, यांच्यासह हिंगणघाट, देवळी, आर्वी येथील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जलपुजनासाठी धाम, वर्धा, वणा व यशोदा या नद्यांचे पाणी आणण्यात आले.
सोहळ्याप्रसंगी वर्धेतील महिला, व पुरूष नगरसेवकांनी तसेच प्रमुख मान्यवरांनी भगवा फेटा परिधान केला होता. प्रमुख मान्यवरांनी शिव छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पणन केल्यानंतर जल घेवून जाणाऱ्या वाहनाला मान्यवरांनी झेंडी दाखविली. कार्यक्रमाचे संचालन राहुल चोपडा यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Four rivers of Warda are going to water for Shivshammar's water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.