वर्धा आगाराच्या ताफ्यात आता चार अत्याधुनिक ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:16+5:30

नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणापासून पॅनिक बटनचा बसगाड्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

Four sophisticated 'Shivshahi' at Wardha Agar | वर्धा आगाराच्या ताफ्यात आता चार अत्याधुनिक ‘शिवशाही’

वर्धा आगाराच्या ताफ्यात आता चार अत्याधुनिक ‘शिवशाही’

Next
ठळक मुद्देआता प्रवासही होणार ‘शाही’

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा एसटी आगाराच्या ताफ्यात शुक्रवारी चार अत्याधुनिक शिवशाही बसगाड्या दाखल झाल्या असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. या गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास अतिशय आरामदायी होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वर्धा आगाराचे पाऊल पुढे पडते आहे.
वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्या. पंत), पुलगाव हे आगार आहेत. संपूर्ण विभागात एकूण २६५ गाड्या आहेत. या गाड्यांत आता नव्याने चार वातानुकूलित, अत्याधुनिक शिवशाही गाड्यांची भर पडली आहे. नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणापासून पॅनिक बटनचा बसगाड्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वच बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा कार्यान्वित करण्यात आली. आगामी काळात विभागातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (व्हीटीएस) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा बसविण्याकरिता महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील संपूर्ण बसथांब्याचे मॅपिंग झालेले आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना घरबसल्याच एसटी बस नेमकी कुठे आहे, हे कळू शकणार आहे. याकरिता डेपोमध्ये साहित्य आले आहे. त्यामुळे नववर्षापूर्वी एसटी बसच्या प्रत्येक बसगाडीचे ठिकाण घरबसल्या आणि कुठेही कळणार आहे.

या वातानुकूलित अत्याधुनिक शिवशाही बसगाड्या आगामी काही दिवसांत वर्धा-शिर्डी आणि वर्धा-शेगाव अशा लांब पल्ल्यावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. वर्धा विभागाच्या वतीने आणखी गाड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या काळात आगाराच्या ताफ्यात आणखी शिवशाही गाड्यांची भर पडणार आहे.
-महेंद्र नेवारे, यंत्र अभियंता (चालन), वर्धा विभाग

Web Title: Four sophisticated 'Shivshahi' at Wardha Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.