चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात हळहळ

By अभिनय खोपडे | Updated: March 14, 2023 14:15 IST2023-03-14T14:09:20+5:302023-03-14T14:15:45+5:30

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ममदापूर येथील घटना

Four-year-old boy dies after falling into well; | चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात हळहळ

चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात हळहळ

वर्धातळेगाव श्यामजीपंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ममदापूर येथील चार वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. प्रियांशू सूरज डोंगरे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

ममदापूर येथील रहिवासी सूरज डोंगरे हे पत्नीसह बकऱ्या चारण्याकरिता जंगलात गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रियांशू हा एकटाच घरी होता. तो बहुदा खेळत खेळत विहिरीजवळ गेला. व त्याचा तोल जावून विहिरीत पडला व त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. ही बाब जेव्हा आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी याची माहिती मुलाच्या आई वडिलाना सांगितली. त्यानंतर तशी माहिती पोलीस ठाण्याला देण्यात आली.

पोलिसांनी घटना स्थळावर दाखल होत मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. चिमुकल्याच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Four-year-old boy dies after falling into well;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.