डुकरांचा मुक्तसंचार, शहरात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:32+5:30

आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.

Free communication of pigs, the climax of the uncleanness in the city | डुकरांचा मुक्तसंचार, शहरात अस्वच्छतेचा कळस

डुकरांचा मुक्तसंचार, शहरात अस्वच्छतेचा कळस

Next
ठळक मुद्देखुल्या नाल्यांमुळे डास वाढले : नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातील मुख्य मार्गावर बसलेल्या मोकाट जनावरे सोबतच आता शहरात डुकरांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले आहे. आर्वीत जागोजागी डुकराचे बस्तान आहे याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.
आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या घाणीमुळे मच्छरांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.
या घाणीत डुकरे बिनधास्त लोळण घेतात आणि परिसरात रोगही पसरवितात एवढेच नव्हे तर अंगणात महिला भांडे घासणे, धुणे आदी कामे करीत असताना डुकरे येऊन भांड्याला तोंड लावतात त्यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. शहरातील या डुकरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिकेला निवेदन दिले आहे.


मोकाट जनावरांचा ठिय्या कचऱ्यांच्या ढिगावरच
आर्वी शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. हा कचरा शहरातून कचरा गाड्या जमा करतात. मात्र अनेकदा नागरिक कुठेही कचरा टाकत असतात. त्यावर मोकाट जनावर, डुकर यांनी ठिय्या दिला आहे. कचºयांवर जनावर चरताना दिसून येतात. डुकरांची मोठी रांगच रांग शहरात अनेक भागात फिरत असल्याचे दिसून येते.यांचा कुणीही बंदोबस्त करीत नसल्याचे चित्र आहे.

आर्वी शहरात डुकरांचे प्रमाण वाढले आहे हे माहीत आहेच त्याचा नागरिकांना त्रास होतो आहे. आम्ही दोन महिन्यापूर्वीच डुकरे पकडण्या संबंधाची जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे. पण अद्यापही कोणी कंत्राटदार हे काम घेण्यासाठी आलेले नाही.
-सुनील आरेकर, आरोग्य अधिकारी नगरपालिका आर्वी.

Web Title: Free communication of pigs, the climax of the uncleanness in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.