बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना विनामुल्य फेरोमन ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:57 PM2018-08-04T23:57:20+5:302018-08-04T23:58:04+5:30
मागील वर्षीपासून कापूस उत्पादक विभागात गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक धोक्यात आले आहे परंतु शेतकऱ्यांनी या संकटाला घाबरून न जाता कामगंध सापळे, निम अर्क व योग्य औषधांची फवारणी वेळेत केली तर या संकटातून मुक्तता होऊ शकते असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : मागील वर्षीपासून कापूस उत्पादक विभागात गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक धोक्यात आले आहे परंतु शेतकऱ्यांनी या संकटाला घाबरून न जाता कामगंध सापळे, निम अर्क व योग्य औषधांची फवारणी वेळेत केली तर या संकटातून मुक्तता होऊ शकते असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले. सुदर्शन इंडस्ट्रीज जाम येथे आयोजित कृषी चर्चासत्रात ते बोलत होते.
हिंगणघाट व समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व हिंगणघाट जिनिंग असोसिएशनच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट येथे फेरोमन ट्रॅपचे वाटप करण्यात आले.
सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम येथे सुध्दा शेतकऱ्यांना १००० फेरोमन ट्रॅपचे वाटप विनामुल्य करण्यात आले.
शेतकरी हितासाठी स्तुल्य उपक्रम राबविण्याबद्दल आमदार समीर कुणावार यांनी कॉटन मील मालकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे उदघाटन समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर यांनी केले.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी धनविजय ,एम. एस.वर्भे, डॉ अमोल झापे, शिंदे , भगत, शंकर धोटे, वांदिले, राऊत, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन चांदेकर, यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत जाजोदिया यांनी मानले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच जिनिंग प्रेसिंगचे पदाधिकारी उपस्थित होते.