ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

By admin | Published: August 27, 2016 12:31 AM2016-08-27T00:31:19+5:302016-08-27T00:31:19+5:30

जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे.

Free Pulgaon-Arvi Shakuntala from British restrictions | ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

Next

रामदास तडस : आमला स्टेशनपर्यंत मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी लोकसभेत शून्य प्रहरात मागणी

पुलगाव : जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे. काही वर्षांपूर्वी ती बंदही करण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव आर्वी शकुंतला रेल्वे मुक्त करून ती ब्रॉडगेज करा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी शून्य प्रहारात लोकसभेत केली.
व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रज भारतात आले आणि राज्यकर्ते होऊन बसले. जिल्ह्यात कवठा येथे त्यांचे मुख्यालय होते. येथूनच त्यांचा व्यापार चालत असे. सर्व भौगोलिक सुविधा व वऱ्हाडातील कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन, बाजारपेठ परिसरात चालणारा दूध दही व लोण्याचा व्यापार, आष्टी-वरूड भागातील उत्पादन या सर्व बाबीचा व्यावसायिक दृष्टीने विचार करून हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावर वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम करून ब्रीज टाऊन पुलगाव शहराची निर्मिती करून ब्रिटिशांनी केली. या परिसराचे महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वेमार्ग शतकापूर्वी सुरू करून परिसरातील जनतेसाठी दळणवळणाचे नवीन दालन सुरू केले होते. देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला. परंतु ही शकुंतला २०१६ पर्यंत ब्रिटीशांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ब्रिटीशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करून आमला स्टेशन पर्यंत तिचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करा, अशी मागणी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खा. रामदास तडस यांना शून्य प्रहारात लोकसभेत केली.
शतकापूर्वी सुरू करण्यात आलेली ही पुलगाव आर्वी शकुंतला दशकापूर्वी तत्कालीन केंद्र शासनाने बंद केली. पूर्वी दळणवळणाचे कुठलेही साधन नसताना ५ आण्यात आर्वीचा प्रवास होत असे. पुलगाव-आर्वी दरम्यान येणाऱ्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमात्र साधन असलेली ही शकुंतला दिवसातून तीनदा धावत होती. त्यामुळे या दोन शहरादरम्यान दुग्धव्यवसाय करणारे गोपाल, नोकरीसाठी शहरात येणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी यांचे आवागमन चालत असे. प्रवासी गाडीच्या व्यतिरिक्त पुलगाव-आर्वी दरम्यान व्यावसायिक दृष्ट्या मालगाडी देखील धावत होती. ही रेल्वे ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे दर दहा वर्षानी या रेल्वेचा भारतीय रेल्वे व ब्रिटीश कंपनीमध्ये करार व्हायचा. शेवटचा करार २००६ मध्ये होवून २०१६ पर्यंत राहणार आहे.
पुलगाव शहरात १८८९ साली पुलगाव कॉटन मील या मोठ्या वस्त्रोद्योगाची सुरूवात झाली. केंद्रीय दारूगोळा भांडारही स्थापन झाले. हेच महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी सुरू करून पुलगाव जंक्शन झाले. परंतु २००७ पासून ही शकुंतला बंद करून या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगे्रजमध्ये रूपांतर करून आमला या रेल्वे स्थानकापर्यंत ही रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्या.
खासदार तडस यांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पुलगाव-आर्वी आमला रेल्वे मार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान केंद्र शासनाने अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे मार्गासाठी १५०० कोटी दिले. मग पुलगाव आर्वी आमला या रेल्वेमार्गासाठी भेदभाव का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्वी-आष्टी वरूड-पुलगाव येथील नागरिकांनी १०० कि़मी. रेल्वे मिशन समिती स्थापन करून ही मागणी लावून धरली आहे. शहरातील विविध संस्था व संघटनांचे या चळवळीला सहकार्य मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Free Pulgaon-Arvi Shakuntala from British restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.