वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संताप
By Admin | Published: June 5, 2015 02:10 AM2015-06-05T02:10:37+5:302015-06-05T02:10:37+5:30
नजीकच्या वरुड(रेल्वे) येथील नागरिक वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे.
वर्धा : नजीकच्या वरुड(रेल्वे) येथील नागरिक वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाच्या गैर व्यवस्थापनामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त होण्याचा धोका असतो. वरुड येथील डि.पी.मध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांनी तक्रारीत नमुद केले आहे. डिपीवरील ग्रीप फुटलेल्या आहे. येतेह नवीन ग्रीप लावण्याची प्रक्रिया केली जात नाही. यामुळे समस्या कायम आहे. काही भागात ठिकाणी विद्युत तारा झाडाच्या फांद्यांना लागतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. या तारा कसून पुरवठा सुरळीत गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. या समस्येची दखल घेत त्वरित कारवाई करण्याची मागणी वरुडवासीयांनी वीज वितरण विभागाकडे तक्रारीतून केली आहे. आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)