आज-उद्यापासून वर्धानगरीत दोन संमेलने, दोन मतप्रवाह, समृद्ध वैचारिक बैठकीचा वाचक-प्रेक्षक घेताहेत शोध

By आनंद इंगोले | Published: February 3, 2023 09:10 AM2023-02-03T09:10:15+5:302023-02-03T09:10:56+5:30

Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांच्या मेळ्याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी आणि कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी सज्ज झाली आहे.

From today to tomorrow, readers and viewers are looking for two meetings, two streams of opinion, a rich ideological meeting in Wardhanagar. | आज-उद्यापासून वर्धानगरीत दोन संमेलने, दोन मतप्रवाह, समृद्ध वैचारिक बैठकीचा वाचक-प्रेक्षक घेताहेत शोध

आज-उद्यापासून वर्धानगरीत दोन संमेलने, दोन मतप्रवाह, समृद्ध वैचारिक बैठकीचा वाचक-प्रेक्षक घेताहेत शोध

Next

- आनंद इंगोले
वर्धा : साहित्यिकांच्या मेळ्याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी आणि कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी सज्ज झाली आहे. एकाचवेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन प्रथमच वर्ध्यात होत असल्याने  साहित्यिकांसह वाचक-प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली आहे. दोन मतप्रवाह असलेल्या या संमेलनाच्या विचारपीठावर समृद्ध वैचारिक बैठक कुठे असणार, याचा शोध घेतला जात आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष दत्ताजी मेघे व प्रमुख अतिथी ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, विदर्भातील बोली-भाषा, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे. ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता, समाज माध्यमातील अभिव्यक्ती : एक उलट तपासणी आणि वैदर्भीय वाड्.मयीन परंपरा यावर परिसंवाद होतील.

अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन
सर्कस ग्राउंडवर साकार झालेल्या कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरीत १७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी, ४ फेब्रुवारी रोजी लेखिका तथा सिने अभिनेत्री रसिका आगाशे-अय्युब यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष प्रा. नीतेश कराळे व डॉ. यशवंत मनोहर यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनात मराठी साहित्य-संस्कृतीला अब्राह्मणी धर्मप्रवांनीच समृद्ध केले. महामानवांची बदनामी, माफीवीरांचे उदात्तीकरण, इतिहासाचे विकृतीकरण, संस्कृतीच्या मिरासदाराचे राजकारण आणि सत्यशोधक समाज, स्वातंत्र्य चळवळ ते दलित पँथर : प्रवास आणि मराठी साहित्याच्या सामाजिक बांधिलकीचा अनुशेष, हे विषय चर्चिले जातील.

Web Title: From today to tomorrow, readers and viewers are looking for two meetings, two streams of opinion, a rich ideological meeting in Wardhanagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.