आरोग्य कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

By admin | Published: September 22, 2015 03:27 AM2015-09-22T03:27:06+5:302015-09-22T03:27:06+5:30

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्या व वेतनासाठी सोमवारी

Front of Zilla Parishad on health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

आरोग्य कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

Next

वर्धा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्या व वेतनासाठी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाद्वारे धडक देण्यात आली.
याप्रसंगी संघटनेच्यावतीने एका शिष्टमंडळामार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दरमहा वेतन नियोजित तारखेस राष्ट्रीयकृत बॅँकेमार्फत करण्यात यावे. आकृतीबंधानुसार आरोग्य पर्यवेक्षकांचे, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यकाची पदे भरण्यात यावी. १७ जानेवारी २०१३ नुसार लोकसंख्येवर आधारीत राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखड्यानुसार नवीन पदे निश्चित करून पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. आरोग्य सेविका-सेवक, आरोग्य सहाय्यक-सहाय्यिका यांना १२ व २४ वर्षाची आश्वासित प्रगती योजनेनुसार लाभ देण्यात यावा. आकृतीबंधानुसार मंजुर असलेली पंचायत समिती कार्यालयातील आरोग्य सेवक या पदावर मंजुर असलेली पदे भरण्यात यावे. आरोग्य पर्यवेक्षक या पदावर आरोग्य सहाय्यिका संवर्गांमधून पदोन्नतीने पदे भरण्यात यावी. आरोग्य सहाय्यक पुरुष या पदावर आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गातील आरोग्य सेवक यांची पदोन्नती करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश होता.
आरोग्य सहाय्यिका या पदावर आरोग्य सेविका या संवर्गातून पदोन्नती करण्यात यावी. मुख्य लेखा शिर्ष २२११ कुटुंब कल्याण व २२१० पटकी प्रतिबंधक योजनेतील मंजुर पदे भरण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्याना दुसरा व चौथा शनिवारला सुट्टी मिळावी. औषध निर्माण अधिकारी व आरोग्य सहाय्यक (स्त्रि/पुरुष) यांना कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात येवू नये. पर्यवेक्षक/अधिकारी यांनी आरोग्य सेविका यांना सायंकाळी ६ वाजता नंतर दप्तर तपासणीकरिता बोलावू नये व त्यांच्या मुख्यालयी जावून तपासणी करू नये, या मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले.
आरोग्य सेवक संवर्गातील बिंदू नामावली व जेष्ठता यादीतील तफावत दूर करावी व सर्व संवर्गाची बिंदू नामावलीची प्रत मिळण्यात यावे. शिष्टंमंडळात राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाने, विभागीय सचिव नलीनी उबदेकर, सचिव प्रभाकर सुरतकर, कार्याध्यक्ष रतन बेंडे, अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे, कोषाध्यक्ष विजय वांदिले, उपाध्यक्ष विजय जांगडे, उपाध्यक्ष सुजाता कांबळे, उपाध्यक्ष संजय डफळे, कार्यकारी सचिव दीपक कांबळे यांचा समावेश होता.(जिल्हा प्रतिनिधी)

४जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना विकास श्रेणी लागू करावी. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे १५ हजार लोकसंख्येस एक आरोग्य सहाय्यिका या नुसार प्रत्येक आरोग्य केंद्राला दोन आरोग्य सहाय्यिकांची पदे निर्माण करावी.
४जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्तरावर मंजूर असलेली आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सेवकांची पदे यथास्थितीत ठेवावी.
४मुख्य लोखाशिर्ष २२११ कुटूंब कल्याण, २२१० पटकी प्रतिबधंक योजनेतील मंजुर पदे भरण्याबातचे आदेश निर्गमित करण्यात यावे.
४आरोग्य सहाय्यक पुरुष पदाचे ग्रेड वेतन २८०० रूपये करण्यात यावे. आकृतीबंधानुसार जिल्हा परिषद स्तरावरील पदे भरण्यात यावे.
४अर्धवेळी स्त्री परिचरांना किमान वेतनानुसार रू. १५ हजार देण्यात यावे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित दरमहा मिळण्यात यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करावा. आरोग्य कर्मचाऱ्याना दुसरा व चौथ्या शनिवारला सुट्टी द्यावी.

Web Title: Front of Zilla Parishad on health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.