फरार आरोपीला राजस्थानात अटक
By admin | Published: July 1, 2017 12:29 AM2017-07-01T00:29:46+5:302017-07-01T00:29:46+5:30
मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट परिसरात अमित कुमरे नामक युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट परिसरात अमित कुमरे नामक युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला वर्धा पोलिसांनी राजस्थान येथे अटक केली. ईशु कृपलानी व उमेश ठाकरे अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, काही युवकांनी मिळून अमित कुमरे यास चाकुने व बेसबॉलचे बॅटने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारुन जखमी केले होते. या प्रकरणातील तीन आरोपींना पुर्वीच अटक केली होती. परंतु मुख्य आरोपी ईशु कृपलानी व उमेश ठाकरे हे फरार होते. या आरोपींच्या शोध संबंधाने वर्धा शहर पोलिसांचे एक पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते. येथे घेवून ईशु उर्फ संदीप दीपक कृपलानी (२८) रा. पोद्दार बगीचा व उमेश ठाकरे (२८) रा. विक्रमशिला नगर वर्धा या दोघांना अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चंदु खोंडे, सचिन दवाळे, अमोल लगड, ज्ञानेश्वर निमजे व विशाल बंगाले यांनी केली.