वर्धा जिल्ह्यात बंदला पूर्ण समर्थन; बाजारपेठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:38 PM2020-12-08T13:38:21+5:302020-12-08T13:38:47+5:30
Wardha News Bharat Band भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला. आय टेक आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व आयटेक सलग्न अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उमेद कर्मचारी, विद्युत कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचर इत्यादी कर्मचारी संघटनेतर्फे शेतकरी संघटनेच्या आयोजित भारत बनला पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला.
पवनारमध्ये शांतता असून कृषी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने स्वत: बंद ठेवली आहेत. अनेक राजकीय पक्षांचा या बंदला पाठिंबा असला तरी कुणी रस्त्यावर आलेले दिसले नाही. शेतकरीही बंदचे समर्थन करताना दिसले मात्र त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमाला महत्त्व देताना दिसले. गावातील कुठल्याच राजकीय नेतृत्वाने पुढाकार न घेतल्याने रस्त्यावर मात्र कुणी दिसले नाही. धोत्रा चौरस्ता येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
तळेगावात बंदा व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली.
तळेगाव शा.पंत येथील सर्व व्यावसायिकांनी आपआपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून शांततेत उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. पुलगावातही बंदला नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे.