जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:31 AM2017-08-15T00:31:46+5:302017-08-15T00:32:17+5:30

येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अत्यंत जीर्ण इमारतीत असून कर्मचारी जीव मुठीत घेऊनच येथे काम करताना दिसतात.

Functioning of animal husbandry running from a dilapidated building | जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज

जीर्ण इमारतीतून चालते पशुसंवर्धनचे कामकाज

Next
ठळक मुद्देभिंतीला पडल्या भेगा : छताची झाली दैना

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/घोराड : येथील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय अत्यंत जीर्ण इमारतीत असून कर्मचारी जीव मुठीत घेऊनच येथे काम करताना दिसतात. तालुक्याच्या स्थळी असलेल्या या महत्त्वपूर्ण विभागाचा कारभार या इमारतीतून चालत असल्याने याविषयी नागरिक आश्चर्य व्यक्त करतात.
या विभागाची इमारत सेलू पंचायत समितीच्या परीसरात आहे. कधीकाळी कर्मचाºयांचे असलेले क्वार्टर या विभागाला कार्यालय म्हणून देण्यात आले आहे. गत दोन वर्षाअगोदर या इमारतीच्या छताचा काही कोसळला होता. सुदैवाने कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांना कोणतीच दुखापत झाली नाही. या इमारतीच्या भिंतीना मोठमोठ्या भेगा गेल्या आहे. इमारतीच्या सभोवताल झाडाझुडपांचा वेढा आहे.
या इमारतीत काही महत्त्वपूर्न यंत्र सुद्धा आहे. शेतकरी व पशुपालक विविध योजनांच्या लाभासाठी येथे येत असल्याने वर्दळ असते. ही इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नसल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते. असे असतांना या जीर्ण इमारतीतून अधिकारी व कर्मचारी आपला विभागाचा गाडा जीव मुठीत घेवून हाकलत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत साधन समुह केंद्राची इमारत धाराशाही झाली होती. १२ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीचे उदाहरण ताजे असताना अशा जीर्ण इमारतीत असणारे हे कार्यालय इतरत्र हलविण्याची गरज व्यक्त होत आहे.
येथे आलेल्या कर्मचारी व नागरिकांच्या अंगावर कधी भिंत कोसळेल किंवा छत पडेल याचा नेम नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्यातील काही नेत्यांचा दबदबा असताना या इमारतीच्या बांधकामाला विकास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.
विकासाच्या गप्पा करणाºया नेत्यांनी ६२ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाºया या कार्यालयाच्या स्थितीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना झाल्यास सदर कार्यालय इतरत्र हलविणार काय अशी चर्चा रंगत आहे.

Web Title: Functioning of animal husbandry running from a dilapidated building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.