देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:35 AM2018-07-09T00:35:54+5:302018-07-09T00:37:01+5:30

राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

Fund for maintenance work | देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी निधी द्या

देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी निधी द्या

Next
ठळक मुद्देखासदारांचे जलसंधारणच्या सचिवांना साकडे : जलयुक्त शिवारबाबत झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. जी कामे झाली त्या कामांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सरकारच्या निधीसोबतच विविध कंपण्यांच्या सि. एस. आर. व लोकसहभागातून कामांकरिता निधी उपलब्ध राहत आहे. कामे पुर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतून देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद आवश्यक आहे. सद्यास्थितीत अनेकवेळा पुर्ण झालेल्या कामांवर निधीची गरज असताना तरतूद नसल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अनेक ठिकाणी उल्लेखनिय कामे झाली आहेत. शिवाय झालेल्या कामांच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधीची गरज असल्याने या विषयी सरकारने गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून खा. रामदास तडस यांनी केली आहे. सदर निवेदन देताना खा. तडस व जलसंधारण विभागाचे सचिव डवले यांच्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत होत असलेल्या व झालेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील तामसवाडा प्रकल्पासह इतर प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी डवले वर्धेत आले होते. निवेदन देताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माधव कोटस्थाने हजर होते.

Web Title: Fund for maintenance work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.