खंडित वीजपुरवठ्याने शेतकºयांत रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:14 PM2017-11-11T22:14:03+5:302017-11-11T22:14:13+5:30

वडगाव (कला), वडगाव (खुर्द) व परिसरातील शेतकरी अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसरातील वीजतारा सदोष असून सैल पडल्या आहेत. रोहित्राचे तीनतेरा झाले आहे.

Fury of farmers with fragmented electricity supply | खंडित वीजपुरवठ्याने शेतकºयांत रोष

खंडित वीजपुरवठ्याने शेतकºयांत रोष

Next
ठळक मुद्देवडगाव शिवारातील प्रकार : तारा सैल पडल्या, रोहित्राचीही दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : वडगाव (कला), वडगाव (खुर्द) व परिसरातील शेतकरी अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसरातील वीजतारा सदोष असून सैल पडल्या आहेत. रोहित्राचे तीनतेरा झाले आहे. वीज कर्मचाºयांचे दर्शनच होत नाही. शेतकरी वैतागून नियम हाती घेत लहान-मोठ्या दुरूस्त्या धोका पत्करून करतात. सध्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कामे सोडून रोहित्राजवळ ठिय्या मांडून बसतात, अशी अवस्था झाली आहे.
या परिसरात बागायती शेती अधिक आहे. केळीच्या बागाही आहेत; पण वीज वितरण कंपनीचा शेतकºयांना शाप आहे. आडात आहे; पण पोहºयात नाही, अशी केविलपाणी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसातून १०० वेळा अर्थात दहा-पाच मिनीट पंप चालला की वीज खंडित होते. याकडे कंपनीचे दुर्लक्ष आहे. रोहित्राजवळ फ्युजच्या पेटीतील फ्युज अनेक वर्षांपासून लावलेच गेले नाही. तेथे थेट फ्युज तार टाकला जातो. लाईनमन नसल्याने शेतकरीच हा धोका नाईलाजाने जीवावर उदार होऊन पत्करतात; पण निद्रिस्त यंत्रणेला जाग येत नाही.
ओलितासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात हजर राहत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने सिंचनच धोक्या आले आहे. वीज खंडित होताच शिवारातील सर्व शेतकरी रोहित्राजवळ गोळा होऊन ठिय्या मांडतात; पण लक्ष देण्यास कुणी तयार नाही. वैतागलेल्या शेतकºयांनी रेहकीच्या वीज कार्यालयात जाऊन निवेदन दिले; पण त्याला केराची टोपली देण्यात आल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. निवेदन दिल्यानंतर अद्याप सुधारणा करण्यात आलेली नाही. शेतकºयांचा रोष वाढत आहे.
यामुळे कायमस्वरूपी वीज कर्मचारी, रोहित्र व तारांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी वडगाव येथील मनोहर हिवरकर, जीवन महाकाळकर, दिनेश बोबडे, नितीन भुरे, कवडू बोबडे, अभिजीत तितरे, नितीन अग्निहोत्री, वैभव शेंडे, प्रशांत शेंडे, जयकुमार शुक्ला, देविदास पारसे, कवडू बेंडे, किशोर वाघमारे, रमेश बावणे, नरेश मालगण, संतोष कुळसंगे, घनश्याम टेकाम, ज्ञानेश्वर राऊळकर, गोपाल बावणे, मनोज तिमांडे, सचिन, विवेक, गणेश शेंडे, जगदीश डोळसकर, पुरूषोत्तम अवघडे, राहुल बोबडे, नंदकिशोर ढोबळे आदी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Fury of farmers with fragmented electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.