शहरात ‘एबल’ घालणार गस्त
By admin | Published: May 27, 2015 02:03 AM2015-05-27T02:03:34+5:302015-05-27T02:03:34+5:30
शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली.
वर्धा: शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली. सदर वाहन शहर व सेवाग्राम ठाण्याच्या हद्दीत फिरणार असून विविध घटना व गुन्ह्याच्या प्रकारावर अंकुश लावणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
सदर वाहनात शहर पोलीस ठाणे, सेवाग्राम पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय येथील कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. पथक गस्त घालून संशयीत इसम व वस्तू आढळून आल्यास भेट देत कारवाई करणार आहे. परिसरात दहशत माजवून मालमत्तेचे आणि शरीराविरूद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवत त्यांच्यावर वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम यातून करण्यात येणार आहे. २४ तास गस्त घालणाऱ्या या नवीन उपक्रमासह यापूर्वी नेमण्यात आलेले मार्शल पथक संपर्कात राहून पुरक कार्यवाही करणार आहे. वाहनाचे लोकार्पण करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एम. वानखेडे, शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुरडे, सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे, पोलीस निरीक्षक मगर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)