वादग्रस्त मुद्यांवर गाजली ग्रामसभा

By admin | Published: August 19, 2016 02:13 AM2016-08-19T02:13:41+5:302016-08-19T02:13:41+5:30

तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध वादग्रस्त मुद्यांवर गाजली.

Gajali Gram Sabha on controversial issues | वादग्रस्त मुद्यांवर गाजली ग्रामसभा

वादग्रस्त मुद्यांवर गाजली ग्रामसभा

Next

गॅस सिलिंडर एजंसीविरूद्ध ठराव : गुन्हे दाखल करण्याची मागणी
गिरड : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध वादग्रस्त मुद्यांवर गाजली. विकासाच्या मुद्यांवरून नागरिकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. सभेच्या अध्यक्षस्थानी रहीम शेख तर अतिथी म्हणून सरपंच चंदा कांबळे, उपसरपंच विजय तडस यांच्यासह ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
येथील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी येणाऱ्या निधीचा विनियोग बेकायदा पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी गरजेच्या कामावर खर्च करण्याचा मुद्दा उपस्थित केला. गावाच्या पर्यटन विकासासाठी साडे आठ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. ग्रामसभेत नेमण्यात आलेल्या समितीच्या मार्गदर्शनात विकास कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटन विकास आराखड्यातून रोजगार संधी मिळावी यासाठी गिरड परिक्षेत्रातील खुसार्पार वनात ४०० एकर निसर्गरम्य जागेवर पर्यटकांच्या निवासी व्यवस्थेची उभारणी करण्याचा मुद्दा उचलून धरण्यात आला. या ठिकाणी जंगलातील चार नाल्याचा संगम असल्याने छोटे तलाव निर्माण करण्यात यावे. यातून रोजगार निर्मिती करण्याचा अनुषंगाने निर्णय घेण्यात आला. गिरड गावाला गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीविरूद्ध ग्रामसभेने ठराव घेत कार्यवाहीची मागणी केली. यावर संबधित विभागाने केलेल्या कारवाईत खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप करीत खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याबाबत ठराव घेण्यात आला.
गावात अतिरिक्त भावात होत असलेली गॅस सिलिंडरच्या विक्रीबाबत गावातील नागरिकांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश दिले होते. शिवाय संबधित एजंसी चालकाला जाब विचारण्यात आला होता. चौकशी अधिकाऱ्याने वरपांगी चौकशी केली. शिवाय खोटे पुरावे जोडून एजंसी चालकाने अहवाल पाठविला, असा आरोप करीत दोषीवर गुन्हे दाखल करावे, असा ठराव घेण्यात आला.
ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मंगेश गिरडे यांची निवड करण्यात आली. शिवाय पंतप्रधान आवास योजना, म. गांधी रोजगार आदी योजनांबाबत माहिती देण्यात आली. यासह गावातील सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतागृह निर्मिती, अतिक्रमण, स्वच्छता, आरोग्य यंत्रणा आदी समस्यांबाबतही नागरिकांनी ग्रामसभा गाजविली. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी सभेत विविध योजनांचे वाचन केले. सभेचे संचालन निर्भय पांडे यांनी केले तर आभार कर्मचारी शंकर महाकाळकर यांनी मानले.(वार्ताहर)

Web Title: Gajali Gram Sabha on controversial issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.