अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:32 PM2018-07-12T23:32:31+5:302018-07-12T23:33:19+5:30
स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
जेसीबी घेवून आलेले न. प. चे अधिकारी व कर्मचारी बघताच छोट्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. न. प. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वी छोट्या अतिक्रमण धारक व्यावसायिकांना तुम्ही केलेले अतिक्रमण स्वत:च काढण्याच्या सूचना केल्या. या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वत:च काढले. तर ज्यांनी सदर सूचनांकडे पाठ दाखविली त्यांच्या अतिक्रमणावर न.प.चा गजराज चालला. ही अतिक्रमण हटाव मोहीम न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न. प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात न. प. बांधकाम विभागाचे अभियंता सुधीर फरसोले, जगताप, प्रविण बोरकर, अशोक ठाकुर, विशाल सोमवंशी, प्रविण बोकडे, निखील लोहवे, आशिष गायकवाड, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, नाना परटक्के, चेतन खंडारे, लिलाधर निखाडे, पेटकर आदींनी केली.