अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:22 AM2018-10-07T00:22:15+5:302018-10-07T00:25:53+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला.
बजाज चौकातील भाजी बाजारात वाढत्या अतिक्रमणामुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची अनेक तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी रस्त्याच्या मधोमध अतिक्रमण करून भाजी विक्री करणाºयांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, सचिव समीर पेंडके, प्रकाश पाटील, बोकडे, बंडेवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अतिक्रमण मोहीम राबविताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांची चमू तैनाद करण्यात आली होती.
रस्ता झाला होता अरुंद
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्यारीत येणाºया बजाज चौक येथील भाजी बाजारात काही भाजी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी येणाºयांना साधी पायी वाट काढताना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. शिवाय रस्ता अरुंद झाला होता. त्याबाबतच्या तक्रारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कार्लेकर यांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.