अल्लीपूरात अतिक्रमणावर गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:07+5:30
गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीच्या नोटीसला न जुमानता सिमेंट रोडलगत बांधकाम केले. ग्रामपंचायतीने या संदर्भात पंचनामा करून पोलीस संरक्षणात अखेर गजराज चालवून अतिक्रमण हटविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : येथील नागरिकांनी अतिक्रमण करून सिमेंटची पक्की घरे बांधली आहे. त्यांना ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. परंतु याकडे कानाडोळा केल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणावर गजराज चालविण्यात आला.
गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीच्या नोटीसला न जुमानता सिमेंट रोडलगत बांधकाम केले. ग्रामपंचायतीने या संदर्भात पंचनामा करून पोलीस संरक्षणात अखेर गजराज चालवून अतिक्रमण हटविले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनीता भोले, मंडळ अधिकारी संजय भोंग, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय दिवटे, सरपंच नितीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामपंचायत सदस्य हारुन अली, सतीश काळे, गजानन बगवे उपस्थित होते. गावातील आणखी अकरा व्यक्तींनी अतिक्रमण केले असून तेही लवकरच हटविले जाईल, असे सरपंच चंदनखेडे यांनी सांगितले.