तीन दिवसांचा अवधी दिल्याने न.प.चा गजराज परतला

By admin | Published: February 14, 2017 01:27 AM2017-02-14T01:27:21+5:302017-02-14T01:27:21+5:30

स्थानिक जुना आरटीओ चौक परिसरातील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील प्रभु विश्वकर्मा यांच्या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, ...

Gajraj returned to Nagpur after a three-day period | तीन दिवसांचा अवधी दिल्याने न.प.चा गजराज परतला

तीन दिवसांचा अवधी दिल्याने न.प.चा गजराज परतला

Next

अतिक्रमण हटाव मोहीम : मंदिर बांधकामाचा मुद्दा
वर्धा : स्थानिक जुना आरटीओ चौक परिसरातील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील प्रभु विश्वकर्मा यांच्या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, अशा सूचना स्थानिक नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याऊपरही मंदिराचे बांधकाम सुरूच असल्याने ते बांधकाम पाडण्यासाठी सोमवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न.प.च्या गजराजसह बांधकाम स्थळ गाठले. यावेळी विरोध झाला.
यानंतर चर्चेतून तीन दिवसांचा अवधी मागितला. त्यावर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने न.प.चा गजराज बांधकाम न तोडताच परतला. दरम्यान काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना आरटीओ चौक बॅचलर रोड या परिसरात नगर पालिका प्रशासनाच्या मालकीची मोकळी जागा आहे. या जागेवर सध्या महाराष्ट्र विश्वकर्मा महासंघाच्यावतीने प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू होते. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा आधार घेत सदर सुरू असलेले बांधकाम थांबविण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना बांधकाम त्वरीत बंद करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याने सोमवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीसह बांधकाम स्थळ गाठले. यावेळी बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मंदिर देवस्थान कमिटीच्या पदाधिकारी व पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी बाजू समजावून घेण्यात आली. यावेळी नगर पालिकेचे अशोक ठाकूर, जगताप, सुरजपाल बघेल, निखील लोहवे, प्रदीप वानखेडे, चेतन कहाते, भोसले, विशाल सोमवंशी, गजानन पेटकर, चेतन खंडारे, विजय किनगावकर, अविनाश मरघडे, फारुकी, प्रशांत मेंढे, लिलाधर निखाडे, डंबारे, मुकीम शेख, मानकर आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

लेखी सूचनाच नव्हत्या-अजय जानवे
बॅचलर रोडवरील जुना आरटीओ चौक परिसरतील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी १७ एप्रिल १९८९ च्या न.प.च्या विशेष सभेत ठराव घेऊन मंजूरी देण्यात आली आहे. सुरू असलेले बांधकाम बंद करण्यासाठी लेखी सूचना देणे क्रमप्राप्त होते. परंतु, केवळ मौखिक सूचना देण्यात आल्या. सदर कार्यवाहीमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ बांधकाम सुरू करू देण्यासाठी संबंधीतांनी आदेश निर्गमित करावा, अशी मागणी अजय जानवे यांनी केली आहे. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करताना मंदिर देवस्थानचे भारत आगरकर, नरेंद्र झापेकर यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Gajraj returned to Nagpur after a three-day period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.