शिखबेड्यात ताशपत्त्यांचा जुगार, ७.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या
By चैतन्य जोशी | Published: January 11, 2024 06:52 PM2024-01-11T18:52:04+5:302024-01-11T18:52:56+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वर्धा : शिखबेडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगार अड्डा उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना अटक करुन जुगारातील डावावर लावलेली ७२ हजारांची रक्कम सात दुचाकी, पाच मोबाईल, ताशपत्ते असा एकूण ७ लाख २३ हजार २३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्यात संघपाल इंद्रपाल डंभारे, राकेश रामलखन यादव, गोकूळ बबन शेंडे, रियाज शेख फारुख शेख, शुभम सतीश रेवडे, दामुजी गणुजी पंडित, अजीज खान कचरू खान यांचा समावेश असून राजकुमार बेतनसिंग बावरी हा गर्दीचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला.
प्राप्त माहितीनुसार, सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिखबेड्यावर ताशपत्त्यांवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिखबेडा परिसरात छापा मारला असता सात जण ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसंनी सर्वांना ताब्यात घेत त्या सर्वांकडील मोबाइल तसेच सात दुचाकींसह डावावरील रोख रक्कम असा एकूण सात लाख २३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, गजानन लामसे, अरविंद येणुरकर, नरेंद्र पाराशर, चंद्रकांत बुरंगे, पवन पन्नासे, भुषण निघोट, महादेव सानप, राजेश तिवसकर, रितेश शर्मा, मनिष कांबळे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, मंगेश आदे यांनी केली.