२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:39 PM2018-07-24T23:39:26+5:302018-07-24T23:40:07+5:30

शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही.

Game with health of 25 thousand people | २५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ

२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ

Next
ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा : ममदापूर तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी जलशुद्धीकरण केंद्रात

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही. त्यामुळे शासनाला लुटणारी यंत्रणा नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी आष्टी वासियांनी केली आहे.
आष्टी नगरपंचायत हद्दीमधील एकूण १७ वॉर्डांना ममदापूर तलावामधुन पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्रावरुन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्र आजारी पडले आहे. येथे शुद्ध होणाऱ्या पाण्याची पाहणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. आहे. तलावातून लाल माती मिश्रित आलेले पाणी येथे शुद्ध होत नाही. ब्लिचींग पावडर व तुरटीचा वापर करुनही पाणी पिवळेच आहे. पाईपांना भलामोठा गंज चढला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जलशुद्धीकरण केंद्राचे पाईप बदलविण्यात आले नाही. आष्टी पोलीस ठाण्याच्या मागील उंच टेकडीवर सदर केंद्र आहे येथे कोणीही फिरकून पाहत नाही. त्यामुळे महिन्याला देखभाल केल्या जात नाही. गोल रिंगण सिमेंट क्रॉक्रीटचे बनविले त्याठिकाणी शेवाळ प्रचंड साचली आहे. गेल्या दोन वर्षापासून एकदाही ड्राय करुन अळया नष्ट केल्या नाही एवढी भयंकर अवस्था आहे.
ममदापूर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे गायी-म्हशी चारण्यासाठी गुराखी उन्हाळाभर जनावरांना तलावात बसायला सोडत होते. अनेक जनावर मृत्यु पावली ती याच पाण्यात पडून मेलीत. पशु पक्षी, रोही, डुक्कर यासारखे जंगली प्राणी येथे मेले. त्याचे मास पाण्यात कुजले. त्यामुळे पाण्याला प्रचंड वास येत आहे. तेच पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येते. ममदापूर तलावात माती जास्त प्रमाणात आहे. गाळ काढण्याचे काम हाती घेतल्या जात नाही.तलावात रेती टाकल्या जात नाही. पाणी सोडण्याचे युनिट दुर्लक्षित आहे. येथे कोणीही येवून पाण्यात काही टाकले तर काहीच सुरक्षा नाही.
ममदापूर तलाव व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्हीच्या देखभाल व संरक्षणाची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आष्टी, शहरामधून दरवर्षी लोकांकडून ४० लक्ष रुपये पाणीपट्टी कर गोळा होते. त्यामधून सर्व देखभाल केल्या जाते. पाणीकराच्या उत्पन्नातील ४० टक्केही निधी खर्च होत नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाणी पिवळे आले एवढी ओरड नागरिक करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती फारच वाईट आहे. आष्टी नगरपंचायतची स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी आहे. पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेवून दुर्गधीयुक्त पाण्याला आळा घालावा. स्वच्छ पाणी देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राला वरचेवर भेटी देवून स्वच्छ झाले की नाही याची पाहणी करावी, तुरटी व ब्लिचींग पाण्यात टाकण्याच्या सुचना द्याव्यात. ममदापूर तलावातील पाण्यात रेती टाकून स्वच्छता राखावी, जनावरांना पाण्यात बसु देव नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यांनीही पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची मागणी आष्टीकरांनी केली आहे. पाणीदार गावांसाठी काम करणाऱ्या संघटनानी ममदापूर तलावात गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. ग्रामस्थांचाही लोकसहभाग यात असायला हवा शासनावर अंवलंबून न राहता हे काम होऊ शकेल.
पाण्याच्या व्हॉल्वभोवताल घाणच घाण
पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन मधील प्रभागनिहाय पाणी सोडण्यासाठी असणारे पाण्याचे व्हॉल्व पाहिले असता त्यात घाणच घाण आहे. डुक्करांच्या पिण्याच्या पाण्याची सोय येथे असल्याचे दिसून आले. नाल्यांमधील कचरा साचला, त्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावरून वाहते. हेच पाणी, पाणी सोडण्याच्या व्हॉॅल्वमध्ये जमा होते. पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अलबत घाणीचे पाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जात आहे.

Web Title: Game with health of 25 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.