रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:06 AM2019-04-14T00:06:59+5:302019-04-14T00:07:19+5:30

पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही.

Game with an iron fist for the stomach | रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाळा संपला की भटकंती सुरू : १४ कुटुंबांकरिता आकाशच झाले छत, उघड्यावरच करतात स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. एकीकडे फॅशन व शौक म्हणून अपुरे कपडे घालतात. तर काहींना आर्थिक अडचणीअभावी पुरेसे कपडे घालता येत नाही. एकीकडे फॅशन म्हणून आपल्या थाळीत उष्टे अन्न ठेवण्यात येते, तर अनेकांना खाण्यासाठी थाळीत अन्न मिळत नाही. अशा विराधाअभावी आणि मन पिळवटून टाकणारी अनेक उदाहरणे या समाजात पहायला मिळतात.
अशाच अत्यंत काबाडकष्ट करून पोट भरण्यासाठी धडपड करणाºया का भटकी कुटुंबियांची भेट घेण्याचा आणि त्यांचे दुख: जाणून घेण्याचा योग आज सकाळी ७ वाजता फिरायला जाताना आला. कारंजा पंचायत समोरील मोकळ्या जागेत ८ मोठी बाया माणसं आणि ६ लहान मुले-मुली. लोहाराचा व्यवसाय करताना दिसून आली.
महिला नाजूक हातात मोठा घन घेत तप्त लोखंडावर आदळून लोखंडाला आकार देत होत्या. तर माणसं तप्त लोखंड धरून त्यावर घाव घालून पाहिजे त्या आकाराची वस्तू बनवित होते. खेळण्याचे दिवस असलेली पाच ते सहा वर्षांची मुले भाता फुकून लोखंडाला तापविण्याचा प्रयत्न करीत होती. या कुटुंबीयांचा प्रमुख पप्पू चव्हाण (६०) यांची प्रतिनिधीने भेट घेत कुटुंबीय व व्यवसायाबद्दल जाणून घेतले. प्रत्येकी चार महिला आणि चार पुरूष, तीन छोट्या मुली व तीन छोटी मुले असे कुटुंब असून मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील गिराम सुवाहा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
पावसाळा संपला की आॅक्टोबर महिन्यामध्ये या व्यवसायासाठी ते निघतात. पावसाळा येईपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात फिरतात. उदरनिर्वाहासाठी सकाळी ६ वाजतापासून या काबाड कष्टाला ते सुरूवात करतात. रात्री ९ पर्यंत व्यवहार चालतो. रात्री येथेच स्वयंपाक करतात अन् झोपतो. सकाळी उठून परत कामाला सुरूवात करतो. महागाईमुळे या व्यवसायातून पोटापुरती मिळकत त्यांना मिळत नाही. पिढीजात म्हणून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले.
मध्यप्रदेशात राहायला घर नाही. शेती नाही, प्लॉट नाही, स्थायी व्यवसाय नाही. सरकार लक्ष देत नाही. म्हणून देशोदेशी या लहान मुलांना घेऊन भटकावे लागते. या भटकंतीमुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव याच कठीण व मेहनती व्यवसायात आमच्या मुलांना शिरावे लागते, असे गटप्रमुख बेतालसिंग चव्हाण यांनी बोलून दाखविले.
कच्चे लोखंड विकत घेऊन त्यापासून कुºहाड, वासला, विळा, व फास अशी अवजारे ते तयार करतात. व्यवसायाला मदत म्हणून कढई, झारे, तवा, सराटे आणून विकतात. राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह चालवितो. बरेचदा इकडे व्यवसायासाठी फिरत असताना मूळ गावात थांबलेले, आई-वडीलाचे देहानवसान होते, पण भेट होत नाही, अशी संवेदनासुद्धा मोहनसिंग सिसोदिया (२६) यांनी व्यक्त केली. शेती व घरगुती कामासाठी ते उपयुक्त अवजारे तयार करतात. पाच किलोचा घन उचलून घाव घालताना छाती, कंबर, पाठ दुखते, पण सांगायचे कुणाला? सगळे दुख अंगाला झेलावे लागते. माणसाला मदत म्हणून सगळं कराव लागतं.
भाता फुकण्याचे काम लहान मुले करतात. त्यांना खेळायला मिळत नाही. इतकी थकतात की पटकन झोपतात आणि सकाळी परत आपल्या आई वडिलांसोबत उठतात आणि कामाला लागतात. झोपायला गादी नाही. कुलर नाही. निसर्गाच्या कुशीत आईवडिलांच्या प्रेमात सर्व विसरून गाढ झोपून जातात. आमच्या समस्या कुणीतही शासनाकडे मांडाव्यात, अशी तीव्र इच्छा सिसोदिया यांनी बोलून दाखविली.

Web Title: Game with an iron fist for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.