स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार ‘गांधी आश्रम’ विज्ञानयुगात देतोय ‘वृक्ष संवर्धना’चाही संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:00 AM2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:15+5:30

सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. शिवाय १९ व्या शतकातील चौथ्या दशकाच्या अखेरीस  वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अशी हाकच दिली. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त्यानंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची रोपटे लावली. ते रोपटे आजही या आश्रम परिसरात असून मागील अनेक वर्षांपासून हे झाड आश्रमात येणाऱ्यांना सावली व प्राणवायू देत आहे.

Gandhi Ashram witnesses freedom movement, gives message of 'tree conservation' in science age | स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार ‘गांधी आश्रम’ विज्ञानयुगात देतोय ‘वृक्ष संवर्धना’चाही संदेश

स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार ‘गांधी आश्रम’ विज्ञानयुगात देतोय ‘वृक्ष संवर्धना’चाही संदेश

Next

दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जमनालाल बजाज यांच्या विनंतीनंतर १९३६  साली महात्मा गांधी वर्ध्यात आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. स्वातंत्र्य चळवळीला याच आश्रमातून महात्मा गांधी यांनी दिशा दिली. त्यामुळे सेवाग्रामचा गांधी आश्रम स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदारच आहे. शिवाय आजही तो संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेच. तर, सध्याच्या विज्ञानयुगात निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा असलेला सेवाग्रामचा गांधी आश्रम वृक्ष संवर्धनाचाही संदेश देत आहे.
सेवाग्राम आश्रम परिसरात महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये पिंपळवृक्ष लावून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले होते. शिवाय १९ व्या शतकातील चौथ्या दशकाच्या अखेरीस  वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अशी हाकच दिली. तो वृक्ष आजही आश्रमात कायम आहे. त्यानंतर येथे अनेक दिग्गजांनी विविध प्रजातींची रोपटे लावली. ते रोपटे आजही या आश्रम परिसरात असून मागील अनेक वर्षांपासून हे झाड आश्रमात येणाऱ्यांना सावली व प्राणवायू देत आहे. सध्या शासन-प्रशासन स्तरावरून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षलागवड व संगोपन चळवळ उभी केली जात आहे. ती काळाची गरजही आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार वृक्ष संवर्धनाचा संदेश देत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सेवाग्राम आश्रम देशी वृक्षांनी नटलेलाच
-    जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि रचनात्मक कार्याची मुहूर्तमेढ रचणारा महात्मा गांधीजींचा  आश्रम देशी वृक्षांनी नटलेला आहे. आधुनिक काळातही वृक्षारोपण, संवर्धनाचा आणि पर्यावरणाचा संदेश देण्याचे महान कार्य आजही डेरेदार वृक्ष देत असल्याचे दिसून येते. सेवाग्राम येथील गांधी आश्रमात पिंपळ, बकुळ, बेल, कडुनिंब, रक्तचंदन, आवळा आदी विविध प्रजातिंची  झाडे आहेत.

तेव्हाच वसुंधरेला परत मिळेल गतवैभव
- विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जात आहे. त्यामुळे वसुंधरेला गतवैभव मिळून देणे ही काळाची गरजच आहे. येत्या पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास वसुंधरेला तिचे गतवैभव मिळून देण्यासाठी मोठा फायदाच होणार आहे.

या दिग्गजांनी लावले गांधी आश्रमात वृक्ष

-    महात्मा गांधी : १९३६ : पिंपळ
-    कस्तुरबा गांधी : १९४२ : बकुळ
-    आचार्य विनोबा भावे : १९६५ : पिंपळ
-    रामनाथ कोविंद : २०१९ : रक्तचंदन
-    राहुल गांधी : २०१४ : बकुळ 
-    मनेका गांधी : २०१६ : आवळा
-    इंदिरा गांधी : १९७२
-    राजीव गांधी : १९८६
-    सोनिया गांधी : २०१० 
-    डॉ. प्रणव मुखर्जी : २०१४ 
-    सोनिया गांधी : २०१८
-    डॉ. मनमोहन सिंह : २०१८ 
-    राहुल गांधी : २०१८

 

Web Title: Gandhi Ashram witnesses freedom movement, gives message of 'tree conservation' in science age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.