गांधी मूल्यांची संपूर्ण जगाकडून दखल
By admin | Published: October 7, 2014 11:39 PM2014-10-07T23:39:19+5:302014-10-07T23:39:19+5:30
२१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना
यशवंत सुमंत : गांधीजींच्या विषयाची प्रासंगिकता यावर चर्चासत्र
वर्धा : २१ व्या शतकाची वाटचाल औद्योगिक क्रांतीतून उत्तर औद्योगिक काळाकडे होत आहे. या प्रक्रियेत जुने मुल्य मागे पडत आहे. संस्थांचे प्रारुप बदलत आहे, कार्यपद्धती बदलली आहे, या सर्व प्रक्रियेत गांधीजींना जगाला दिलेल्या मुल्यांची शिकवण जोपासली जात आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि या मुल्यांची गरज संपूर्ण जगाला असल्याने त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे विचार पुणे विद्यापीठाचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात २१ व्या शतकात गांधी विचारांचे महत्त्व या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी राष्ट्रराज्याच्या प्राथमिक संस्था, घटक यांचे विवेचन केले. तसेच राष्ट्रराज्याला बळकटी देण्यासाठी गांधी मुल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती प्रा. गिरीश्वर मिश्र होते. तसेच विभाग प्रमुख डॉ. नृपेंद्र सिंह यांची उपस्थिती होती यानंतर बोलताना मिश्र यांनी समाजात वाढती हिंसा, मानवी संहार याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गांधी मुल्यांचा गाभा मनुष्य असल्याचे सांगितले. गांधीजींच्या कल्पनेतील मानव हा सामंजस्य, पे्रम आणि नियमांचे पालन करणारा होता.
प्रास्ताविक डॉ. सिंह यांनी केले तर आभार विभाग सहाय्यक प्रा. राकेश मिश्र यांनी मानले. यावेळी प्रा. अनिल राय, प्रा. शंभु गुप्त, डॉ. डी. एन. प्रसाद, डॉ. चित्रा माली, डॉ. सुरजीत कुमार सिंह, डॉ. अमित राय, डॉ. शंभु जोशी, डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. सुप्रिया पाठक, रविशंकर सिंह, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, संदीप सपकाळे व प्राध्यापकांची उपस्थिती होती. आयोजनाला विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)