गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:33 AM2019-01-31T00:33:10+5:302019-01-31T00:34:36+5:30

गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती.

Gandhi was also accused and even now | गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

googlenewsNext
ठळक मुद्देअपूर्वानंद झा : ‘गांधींचा मृत्यू’ विषयावर सेवाग्राम आश्रमात विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती. देशात अल्पसंख्यकांच्या नैतिक अधिकाराचे संरक्षण व्हायला पाहिजे, असाही प्रयत्न त्यांचा होता. गांधींवर खोटे आरोप सतत केल्या गेले; शिवाय ते आजही होत आहेत. त्यातील काही मंत्री तर काही प्रधानमंत्री झाले. गांधींना बदनाम करणे सुरूच असल्याने आज खऱ्या अर्थाने गांधीजींचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी केले.
सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘गांधींचा मृत्यू’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अपूर्वानंद झा पुढे म्हणाले, गांधीजींनी प्रार्थनेला खुप महत्त्व दिले. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत विरोध झाला त्यावेळी बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळुहळू होत असतो तसेच गांधीजी सुद्धा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केली असेही झा यांनी सांगितले. देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्पात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. त्यावेळीही मोठा विरोध झाला; पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेत घाबरू नका, घर सोडू नका, हिंसा करू नका, असे आवाहन करू लागले. भेटी, आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले. तर दुसरीकडे कलकत्ता, पंजाब, दिल्ली येथेही दंगली सुरू झाल्या होत्या. दिल्लीत १९४७ मध्ये धार्मिक दंगल भडकली असता गांधीजी दिल्लीत आले. दिल्लीत शरनार्थींची संख्या वाढली. बुढ्ढा मरता है तो मरने दो असे विरोधक म्हणायला लागले. मात्र बापू शांती, अमनसाठी प्रयत्नरत होते. १२५ वर्ष जगण्याची इच्छा ठेवणाºया बापूंना मात्र दंगलीने आता एक दिवस, पण जगायचे नाही असे म्हणायला लावले. उपोषणाचा निर्णय घेताला. तीन दिवसात हिंसाचार थांबला आणि शांती निर्माण झाली. गांधीजीवर सहा हल्ले झाले. त्यातील एक सेवाग्राम आश्रम पुढे झाला. हिंदूना नामर्द बणविले, पाकिस्तानला ५५ कोटी दिले, पाकिस्तानातील हिंदूवर अत्याचार झाला; पण गांधीजींनी काहीही केले नाही. ते देशातील मुस्लीमांची बाजू घेतात असा सनातन्यांनी वारंवार आरोप केला. शिवाय आजही तो केल्या जात आहे. वास्तवात गांधींमुळे खेड्यापासून तर शहरापर्यंत तसेच विदेशातील महिला प्रभावित होऊन गांधीजींच्या चळवळीत व स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. देशात व पाकिस्तानात ज्या दगली भडकल्या त्या थांबविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. बँ.जीना सोबत चर्चा करीत होते. त्यांनी लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला होता. जीनानी वचन पाळावे, असे गांधीजींनी सांगितले होते. मग गांधी काहीच करीत नाही हा आरोप मुळातच खोटा असून गांधींना बदनाम आणि मारण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याचे दिसून असल्याचे यावेळी प्रा. डॉ. झा यांनी स्पष्ट केले. संचालन जीवन अवथरे यांनी केले.
बापूंची हत्याच झाली
बापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनीही गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधींपासून असल्याचे ते मानत. गांधीजींची हत्या झाली तिही प्रार्थनेला जाताना. गोडसे बापूंच्या पाया पडले नंतरच त्यांनी गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

Web Title: Gandhi was also accused and even now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.