समस्यांचे समाधान गांधीजींनी विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहातून केले

By admin | Published: January 1, 2017 02:07 AM2017-01-01T02:07:54+5:302017-01-01T02:07:54+5:30

आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला

Gandhiji resolved the problem through thought, truth, non-violence and Satyagraha | समस्यांचे समाधान गांधीजींनी विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहातून केले

समस्यांचे समाधान गांधीजींनी विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहातून केले

Next

सामदोंग रिंपोंछे : ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर प्रबोधन
सेवाग्राम : आज देशात मानवी विकासाचे काम करण्यात येत आहे. धर्म, सांप्रदायिकता यातील भांडणे मानवाला मानवापासून दूर नेण्याचे काम करीत आहे. मानवाचा विकास हा राजकीय विषयाचा बिंदू ठरल्याचे दिसून येत असल्याने देशातील गरीबी कमी झाली नाही. यामुळे वर्तमान शब्द कठीण वाटत नसला तरी सामान्यांचे जीवन कठीण असल्याचे दिसते. गांधीजींनी समस्यांचे समाधान विचार, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून केले, असे मत आचार्य सामदोंग रिंपोंछे यांनी सांगितले.
येथील नई तालीम समितीच्या शांती भवनात गुरूवारी ‘वर्तमान समस्यांबाबत गांधी चिंतनाची उपयोगिता’ यावर उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सामदोंग रिंपोंछे म्हणाले की, मानव वर्तमान काळात राहतो; पण भविष्य व भूतकाळात वावरतो. कर्तव्यामुळे तो कार्य सरळ करतो. आज जी परिस्थिती दिसते, ती अचानक निर्माण झाली नसून इतिहासाच्या घटनाक्रमातून उत्पन्न झाली. त्यामुळे या समस्यांचे भागीदार आपणही किती आहो, याचा विचार व्हावा, भ. बुद्ध व गांधीजींमध्ये जीवनाला समजण्याची क्षमता समान पातळीवर दिसते. समस्या व दु:खाचे कारण शोधल्यास उपाय मिळतो. त्याला दूर केले की, सुखाची प्राप्ती होते. म्हणून दु:खाचे कारण कलूषित मानसिकता आणि अज्ञानात आहे. गांधीजींना गाडीतून बाहेर ढकलले; पण त्यांनी दोष न देता कारणाचे शोधण व निवारण केले. यातूनच असत्याची विचारधारा, शोषणाची दिशा यावर काम करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग मिळाला. विकास स्वरूप प्राप्त करण्यासाठी लाभ-हानीचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. प्रकृतीचे शोषण केले जाते. पुंजीवाद व औद्योगिक सत्ता एकवटली जात असून याचे गंभीर संकेत मिळत आहे. मोठ्या हानीचा सामना करावा लागत आहे. मनुष्याला संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. चर्चमध्ये बुटात जातो; पण विमानात तपासणी होते. शेजारी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध असावे. पर्यावरणाचा ऱ्हास घातक ठरत आहे; पण समाधान मिळत नाही. म्हणून परत गांधीजींच्या सत्य, अहिंसेकडे वळावेच लागेल. सत्याग्रहात तर्कविर्तक शोधण्याची गरज नाही. गांधीजींच्या जीवन पद्धतीला समजून घेत कार्य करणाऱ्यांनी प्रचार, प्रसाराचे काम चालूच ठेवावे. कार्य, साधन शुद्धता, चित्त शुद्धता ठेवावे. स्वार्थरहित असावे. शोषणाचे साधन बनू नये. जीवन पवित्र असल्याने समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. प्रारंभी आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘इतनी शक्ती हमे दे’ गीत गायले. प्रास्ताविक डॉ. सुगन बरंठ, संचालन प्रदीप खेलूलकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले.(वार्ताहर)

Web Title: Gandhiji resolved the problem through thought, truth, non-violence and Satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.