गांधीजींचा अपमान सहन केला जाणार नाही
By Admin | Published: January 17, 2017 01:05 AM2017-01-17T01:05:30+5:302017-01-17T01:05:30+5:30
खादी ग्रामोद्योग प्रकरणावर हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी गांधीजी बद्दल बेजबाबदार व अपमानजनक वक्तव्य करून गांधीजींचा अपमान केला आहे.
निवेदनातून सामाजिक संघटनांनी व्यक्त केला संताप
हिंगणघाट : खादी ग्रामोद्योग प्रकरणावर हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी गांधीजी बद्दल बेजबाबदार व अपमानजनक वक्तव्य करून गांधीजींचा अपमान केला आहे. ज्या मुळे देशातील नागरिक दु:खी झाले असून तसा रोष येथील नागरिकांनी निवेदनातून व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांना सादर केलेले निवेदन येथील उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी स्वीकारले.
भारताची ओळख ही महात्मा गांधींचा देश म्हणून असताना त्याच देशात त्यांचा अपमान आता सहन केला जाणार नाही. अहिंसेच्या ताकदीची जाणीव ठेवावी असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, सर्वोदयी रमेश झाडे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर, लोकसाहित्य परिषदेचे सचिव ज्ञानेश चौधरी, गांधी विचार प्रचारक प्रा. अभिजित डाखोरे, सतीश चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गजानन कारामोरे, अभि साबळे आणि विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)